Gondia News Saan tv
महाराष्ट्र

Gondia News : अबब.. अजगराने कोंबड्यासह गिळला लोखंडी रॉड; पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने दिले जीवदान

Gondia News : गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथे हि घटना घडली. जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगांव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथील पोल्ट्री फाॅर्ममध्ये ६ ते ७ फूट लांबीचा अजगर साप घुसला होता

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: जंगल परिसरातून वस्तीत आलेल्या भल्यामोठ्या अजगर सापाने २ किलोच्या कोंबड्यासह लोखंडी रॉड गिळून घेतला होता. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने सर्पमित्रांना बोलावून कोंबडा व लोखंडी रॉड बाहेर काढण्यात आला. यानंतर अजगर सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. 

गोंदियाच्या (Gondia News) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथे हि घटना घडली. जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगांव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथील पोल्ट्री फाॅर्ममध्ये ६ ते ७ फूट लांबीचा अजगर साप घुसला होता. या अजगराने दोन किलो वजनाचा कोंबडा गिळून घेतला होता. याच सोबत लोखंडी रॉड देखील गिळंकृत केला होता. दरम्यान पोल्ट्री फॉर्ममध्ये अजगर शिरल्याची माहिती मिळताच सर्पमित्र यांना बोलाविण्यात आले. सर्पमित्राने अजगर सापाला (Snake) रेस्क्यू करून पकडले असता त्यामध्ये कळले की सापाने कोंबडीसह लोखंडी रॉड गिळल्याचे समजले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. 

वन विभागाचे (Forest department) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी अजगर सापाला पशु वैद्यकीय दवाखाना मोरगाव अर्जुनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सापाने गिळलेला कोंबडा व लोखंडी रॉड बाहेर काढण्यात आले. त्यांनतर अजगर सापावर उपचार करून त्याला निसर्गमुक्त ठिकाणी सोडण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT