Gondia Accident Saam tv
महाराष्ट्र

Gondia Accident : अंत्यदर्शनाला जाणाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात; अपघातात तिघांचा मृत्यू

Gondia News : मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगडकडे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनला निघाले होते.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. (Gondia) त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. (Live marathi News)

जैन धर्मियांचे दिगंबर पंथीयांचे सर आचार्य विद्यासागर महाराज यांचे छत्तीसगडच्या डोंगरगड येथे रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. (Madhya Pradesh) मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगडकडे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनला निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुडून झाला मृत्यू 

अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा गोंदियाच्या पानगाव येथे पुजारीटोला धरणाच्या कालव्यात गाडी कोसळली. दरम्यान कालव्यामध्ये पाणी असल्याने पाण्यात बुडून गाडीतील तिन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तर अन्य तिघे भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT