dhan kharedi till 31 march in gondia saam tv
महाराष्ट्र

Gondia : शासकीय धान खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ

Gondia Latest Marathi News : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन द्वारे एक लाख 22 हजार 291 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia :

गतवर्षीच्या तुलनेत यंदा शासकीय केंद्रावर धान खरेदी कमी हाेत असल्याचे चित्र आहे. शासकीय धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांकडे धान विक्री करु लागले आहेत. दरम्यान 31 मार्च पर्यंत शासकीय धान केंद्रावर धान विक्री करण्यासाठीची मुदत वाढ देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोंदिया जिल्ह्या हा धानाचा जिल्हा अशी ओळख आहे, जिल्ह्यात गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागातर्फे धान खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते मात्र या वर्षी शासकीय धान केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी धान खरेदी झाली आहे.

गतवर्षी 40 लाख 98 हजार कींटल धान खरेदी शासन कडे झाली होती. यंदा 25 लाख क्विंटल धान खरेदी झाली नाही. यंदा धान खरेदी केंद्राकडे कडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून खाजगी व्यापाऱ्यांना उच्च दरामध्ये धान विक्री करत असल्याचे चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. (Maharashtra News)

गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावर मालाला 2 हजर 180 रुपये दर देण्यात येतो. खाजगी व्यापाऱ्याकडे 3 हजार ते 3500 रुपये पर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा खाजगीकडे व्यापाऱ्यांकडे वाढले असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.

76 हजार 600 शेतकऱ्यांनी विकले धान

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन द्वारे एक लाख 22 हजार 291 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली. मात्र त्यापैकी 76 हजार 600 शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपले धान खाजगी व्यापाराला विकले असून खाजगी व्यापाऱ्यांकडून जास्त नफा या शेतकऱ्यांना मिळवलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता खाजगी व्यापाराकडे वळला आहे. याचप्रमाणे शासकीय धान खरेदी केंद्रावर सुध्दा जास्त दर मिळावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार कोल्हापुरात

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

एक नंबर! आता कॉलसाठी नसणार SIMची गरज; भारतात पहिल्यांदा Satellite to Device सर्विस सुरू

रणबीर कपूरचे हे ७ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यादीच आली समोर

SCROLL FOR NEXT