SSC Exam 2024 : विद्यार्थ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांनी भडाग्नी देत ऋषिकेशने माेठ्या धैर्याने दिला दहावीचा पहिला पेपर

Latur Marathi News : या कठीण काळात त्याला परीक्षा देता यावी यासाठी शिक्षण विभागाने त्याला गावातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठीची व्यवस्था केली.
student attend marathi subject paper after fathers death
student attend marathi subject paper after fathers death saam tv
Published On

- संदीप भाेसले

Latur News :

उद्या दहावीचा (ssc exam 2024) पहिला पेपर आणि विद्यार्थ्याच्या वडिलांचा अपघात झाला. या घटनेत विद्यार्थ्याचे वडिलांचे निधन झाले. या घटनेने त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची पायाखालची वाळू सरकली. दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील वडिलांची इच्छापूर्तीसाठी माेठ्या धैर्याने लातूर जिल्ह्यातील ऋषिकेश रामनाथ पुरी याने मराठीचा पेपर दिला. त्याला शिक्षण विभागाने केलेले सहकार्य माेलाचे ठरले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहावीची परीक्षा प्रत्येकाच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वर्षभर कठीण परिश्रम करून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या परीक्षेचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो. अनेक विद्यार्थी कठीण परिस्थितीतही शिक्षण सुरु ठेवतात याची अनेक उदाहरणं आपल्यासमाेर आहेत.

student attend marathi subject paper after fathers death
SSC Exam 2024 : दहावीचा पेपर सुरु असताना पाेरं शाळेच्या भितींवर चढली, कॉपी बहाद्दरांना केला पूरवठा; व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश रामनाथ पुरी या विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक आयुष्यातील पहिला टप्पा कठीण काळात सुरु ठेवला. त्याच्या वडिलांचे गुरुवारी सायंकाळी अपघाती निधन झाले. ऋषिकेशवर दुःखाचा डोंगर कोसळला.  (Maharashtra News)

या कठीण काळात त्याला परीक्षा देता यावी यासाठी शिक्षण विभागाने त्याला गावातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठीची व्यवस्था केली. ऋषिकेशने वडिलांचा अंत्यविधी करून नयनाश्रूंनी परीक्षा दिली. त्याच्या या धैर्याचे काैतुक करीत अनेकांनी अश्रूंना वाट माेकळी करुन दिली.

Edited By : Siddharth Latkar

student attend marathi subject paper after fathers death
वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा राज्य सरकारला 5 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com