Dengue Maleria Spreading Gondia Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Malaria Report: गोंदियात साथीच्या रोगांचा प्रकोप... मलेरियाने घेतला २ जणांचा बळी; जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद

Dengue Maleria Spreading Gondia: मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्याची नोंद झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Gondia News:

गोंदिया जिल्ह्यात सध्या विविध आजारांची साथ सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्याची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिन्यांत मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्हावासीयांनी डासांपासून जास्त सावध राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे...

पावसाळा आला की साथीच्या आजारांचा सुळसुळाट वाढतो. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेंग्यू, मलेरियांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. गोंदिया जिल्ह्यात (Gondia) डोळ्यांची साथ जेमतेम आटोक्यात आली असतानाच आता तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. यामध्ये व्हायरल, टायफॉईडचा ताप असतानाच आता मलेरियाच्या (Maleria) तापाने ताप वाढविला आहे.

जिल्ह्याला डासांचे ग्रहण असून, काही केल्या येथून डासांचा नायनाट करणे शक्य नाही अशी स्थिती आहे. ही बाब गोंदिया शहरापुरतीच लागू होत नसून, अवघ्या जिल्ह्यालाच डासांनी ग्रासून सोडले आहे. डासांपासून मलेरिया व डेंग्यूचा जास्त प्रमाणात धोका दिसून येतो.

त्यातही डेंग्यू (Dengue) म्हणताच भल्याभल्यांच्या अंगाला घाम फुटतो. मात्र, जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरियाच जास्त जीवघेणा ठरत आहे. मलेरिया मुळे दोघांचा जीव गेला असुन मलेरियाचे २०२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रभावामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत ठाकरेंची रणनीती ठरली? ठाकरेंच्या एकीनं महापालिकेत बळ वाढलं

मराठमोळ्या खेळाडूकडे भारताचं नेतृत्व; U-19 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा, कोणाला मिळाली संधी अन् कोणाला डच्चू?

मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवाद्यांची घुसखोरी, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोध मोहीम

Maharashtra Live News Update: ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबईसाठी परप्रांतिय स्टार प्रचारक, युपी-बिहारचे नेते करणार मुंबईत प्रचार

SCROLL FOR NEXT