मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु व्हायला अजून वेळ असला तरी मुंबई जिंकण्यासाठी महायुती मात्र कामाला लागलीये. एकीकडे जागावाटप, युती आघाडी ठरत नसली तरी महायुतीनं मुंबईतल्या मोठ्या परप्रांतिय व्होटबँकची मर्जी वळवण्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत परप्रांतिय नेत्यांचा भरणा केलाय. त्यामुळे मराठमोळ्या मुंबईत आता युपी - बिहारवरुन नेते येऊन मुंबईकरांनी कोणाला सत्तेत बसवावं हे सांगण्यासाठी येणारेत महायुतीतच्या स्टार प्रचारकांमध्ये कोण कोण आहेत
मुंबईत परप्रांतिय प्रचारक
योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश
मनोज तिवारी
खासदार
रवी किशन
खासदार
मैथिली ठाकूर
आमदार, बिहार
निरहुआ (दिनेशलाल यादव)
अभिनेते
मुंबईत अमराठी आणि परप्रांतिय मतदारांचं प्राबल्य असलेले अनेक वॉर्ड आहेत. तिथं युपी बिहारी गुजराती भाषिकांचं वर्चस्व असून त्यांच्या कडे प्रत्येक पक्ष व्होटबँक म्हणूनच पाहात आलाय. त्यातच नुकत्याच झालेल्या मराठी हिंदी वादात ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानं सेना मनसेच्या हिंदी द्वेषाचा मुद्दा उचलून फायदा करुन घेण्यासाठी आणि या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं थेट परराज्यातून प्रचारकांना बोलवण्याचं नियोजन केलंय. तर शिंदेंनी अमराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रचारात अभिनेता गोविंदाला उतरवण्याचं ठरवलंय.
निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधी महायुतीच्या या स्टार प्रचारकांच्या नियुक्तीनं आता आरोप प्रत्यारोपांचा नारळ फुटलाय. मराठमोळ्या मुंबईत युपी बिहारचे नेते येऊन प्रचार करणार असतील तर आता मराठी भाषिकांच्या या महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारण ६ महिन्यांपुर्वीच भोजपुरी अभिनेता निरहुआनं मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा' मराठी माणसाला चँलेज देणारं केलेलं विधान अजूनही मराठी माणूस विसरलेला नाही नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.