Gram Panchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: सरपंच खुर्चीसाठी सासू विरूद्ध सुनेची काटे की टक्कर; कोण मारणार मैदान

सरपंच खुर्चीसाठी सासू विरूद्ध सुनेची काटे की टक्कर; कोण मारणार मैदान

अभिजीत घोरमारे

गोंदिया : आजपर्यत्न घरात सासू– सुनेत वर्चस्वाची लढाई नेहमी पाहिली आहे. मात्र गावाची कारभारींन बनण्यासाठी सासु- सुनेची थेट लढत पहिल्यांदा गोंदियात (Gondia) पहायला मिळत असून बोदरा देऊळगाव ग्रामपंचायती (Gram Panchayat) निवडणुकीमध्ये हा प्रकार पहायला मिळत आहे. (Letest Marathi News)

मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बोदरा देऊळगाव ग्रामपंचायतीत ही सरळ लढत आहे. येत्या 18 डिसेंबरला 1 हजार 650 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीची निवडणुक (Election News) प्रक्रिया पार पडणार आहे. पंधरा वर्षानंतर या ग्रामपंचायतीला अनुसूचित जाती महिला सरपंच पद राखीव झाले आहे. येथे सरपंच पदासाठी सासु- सुनेमध्ये थेट लढत होणार आहे. आता गावात प्रभावी महिला शोधून सरपंच पदासाठी उभे करणार म्हणून देऊळगाव येथील मंदा योगिराज ढवळे (सासुबाई) यांना गावातील स्थानिक नेत्यानी सर्व धर्म समभाव पॅनलतर्फे सरपंच पदासाठी निवडणुकीत उभे केले.

आता निश्‍चीत केलेली महिला सरपंच होणार; असे गावकरी मानत असतांना आपणही प्रभावी महिला आहोत असे म्हणत सुनबाई कशी मागे राहणार म्हणून किरण मिलिंद ढवळे (सुनबाई) यांनीही आपल्या काकेसासु विरुद्ध अपक्ष सरपंच पदासाठी निवडणुकीत उभ्या झाल्या. अचानक चुलत सुनेद्वारे आपला विरुद्ध सरपंच पदासाठी अर्ज भरल्याने सासुबाई कोमात सुन जोमात अशी स्थिती निर्माण झाली आहे. दोन्‍हींचा गावात दांगडा प्रस्त असल्याने गावकरी कोणाला मत द्यायचे म्हणून बुचकल्यात पडले असून ढवळे नातेवाईकही या निवडणुकीत मतदार असल्याने कोणाला मत द्यायचे या पेचात पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहिल्यानगर कार्यालयाचे स्थलांतर होणारच- विखे पाटील

'देऊळ बंद 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! अभिनेत्री स्नेहल तरडेने शेअर केले सेटवरचे 'Unseen' फोटो

Famous Actor Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि स्टँड-अप कॉमेडियन यांचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट, सरचार्ज रद्द होणार? बड्या नेत्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

Accident News : भीषण दुर्घटना! धावत्या कारने घेतला पेट; माजी सरपंचासह कुटुंबातील ४ सदस्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT