Gram Panchayat Election: प्रचाराचा अखेरचा दिवस; तोफा थंडावण्यापूर्वी उमेदवारांची प्रचाराची लगबग

प्रचाराचा अखेरचा दिवस; तोफा थंडावण्यापूर्वी उमेदवारांची प्रचाराची लगबग
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv
Published On

धुळे : धुळे जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (Election News) रणधुमाळी सुरू आहे. यात आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यामुळे उमेदवारांतर्फे प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचून आज प्रचार केला जात आहे. (Breaking Marathi News)

Gram Panchayat Election
Beed News: महाविकास आघाडीला धक्का; बीडच्या धारूर बाजार समितीवर भाजपची एक हाती सत्ता

धुळे (Dhule News) जिल्ह्यात १२८ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे आता १२० ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळेच सर्वच उमेदवारांतर्फे आज प्रचाराचा धुरळा उडविला जात आहे.

रविवारी मतदान

येत्‍या रविवारी अर्थात १८ डिसेंबरला या १२० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडलेल्या ग्रामपंचायतिची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com