Beed News: महाविकास आघाडीला धक्का; बीडच्या धारूर बाजार समितीवर भाजपची एक हाती सत्ता

महाविकास आघाडीला धक्का; बीडच्या धारूर बाजार समितीवर भाजपचे एक हाती सत्ता
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : बीड जिल्ह्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) धक्का देत एक हाती सत्ता मिळवली आहे. धारूर बाजार समितीवर (BJP) भाजपचा झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत भाजपने 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. (Maharashtra News)

Beed News
Cyber Crime: व्हिडीओ कॉल करून आर्मी जवानांची तपासणीसाठी विनंती; बारकोड पाठवून डॉक्टरसह परिचारिकेला गंडा

बीड (Beed) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या अगोदर स्थानिक सहकारी संस्थेमधील बाजार समिती ताब्यात आल्याने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (Election News) देखील मोठ्या प्रमाणात गुलाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, भाजप नेते रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे यांच्या अथक परिश्रमाने विजय मिळवण्यात यश आले आहे

आमदार सोळंकेंना धक्‍का

ग्रामपंचायत मतदार संघात 72 तर सोसायटीतील उमेदवारांनी 60 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचा हा एक हाती विजय असल्याने आमदार प्रकाश सोळंके यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com