शुभम देशमुख
गोंदिया : महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या राज्यात आगामी काळात निवडणूक होणार आहे. याच (Gondia) दरम्यान शालीमार एक्स्प्रेसमध्ये एकाला संशयीतरित्या पकडण्यात आले होते. त्या व्यक्तीकडून तब्बल ५०.३५५ किलो चांदी (Silver) आढळून अली आहे. हि कारवाई गोंदिया रेल्वे पोलिसांनी केली आहे. (Tajya Batmya)
सीमेवरच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निडणुका होणार आहेत. अश्यातच विशेष तपासणी मोहिमेदरम्यान क्राईम इंटेलिजन्स ब्रँच, गोंदिया, नागपूर आणि टास्क टीमच्या फोर्स सदस्यांद्वारे ट्रेन क्रमांक १८०२९ शालीमार एक्स्प्रेसमध्ये सखोल तपासणी केली. प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे सुमारे ५० किलो वजनाची चांदीची विविध प्रकारची छोटी भांडी आढळून आली आणि त्याच्याकडे असलेल्या बिलाच्या कागदपत्रात संशयास्पदता आढळून आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२१ लाख ४० हजाराची चांदी
शालिमार एक्सप्रेसमधून प्रवास करताना एकाला गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडले आहे. त्याच्याकडे आढळून आलेल्या ५० किलो चांदी अवैधरित्या तस्करी करताना आढळली. ज्याची किंमत २१ लाख ४० हजार ८७ रुपये आहे. याप्रकरणी (Railway Police) रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.