Gondiya Crime News Saam Tv
महाराष्ट्र

40 हजारांची लाच घेताना शिपायाला अटक; बाजार निरीक्षक फरार

टीकाराम मेश्राम (वय 60 वर्ष) असे अटक केलेल्या सेवानिवृत्त शिपायाचे नाव आहे

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया (Gondiya) नगर परिषदेच्या सेवानिवृत्त शिपायाला 40 हजार रुपयांची लाच घेताना (Crime) लाचलुचपत पथकाने अटक केली आहे. शिपायाला अटक होताच लाच मागणारा बाजार निरीक्षक मात्र फरार झाला आहे. टीकाराम मेश्राम (वय 60 वर्ष) असे अटक केलेल्या सेवानिवृत्त शिपायाचे नाव आहे. तर, मुकेश मिश्रा असे फरार बाजार निरीक्षकाचे नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Gondiya Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीचे गंज बाजार येथे मालकीचे दुकान आहे. दुकानाची नोटरी करून तक्रारदाराला दुकान आपल्या मुलाच्या नावावर करायचे होते. यासाठी 30 हजार रुपये द्यावे लागतील असे मुकेश मिश्रा याने तक्रारदाराला सांगितले होते. ही लाच सेवानिवृत्त शिपाई टीकाराम मेश्राम यांच्याकडे देण्यात यावी असे मिश्रा याने सांगितले होते. तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान, लाचलुचपत पथकाने सापळा रचत सेवानिवृत्त शिपाई मेश्राम याला नगरपरिषद गोंदिया येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मेश्राम याला अटक झाल्याची भनक लागताच बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा हा फरार झाला आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, लाचलुचपत पथकाने आरोपी टीकाराम मेश्राम आणि मुकेश मिश्रा या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी मेश्राम याला अटक करण्यात आली असून पोलीस मिश्रा याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर नगर परिषदेत किती भष्टाचार सुरु आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT