Gondia Crime News Saam TV
महाराष्ट्र

Gondia Crime News: चोर आहे की पहिलवान; कड्या, कुलूप नाही तर थेट भिंत फोडून ५ लाखांची चोरी

Gondia Theft News: तब्बल ७ ते ८ लाख रुपये किंमतीचे मोबाईल येथून लंपास करण्यात आलेत.

Ruchika Jadhav

Gondia News:

गोंदियातून चोरीची एक अजब घटना घडली आहे. आमगाव येथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पवार मोबाईल शॉपमध्ये चोरी झाली आहे. तब्बल ७ ते ८ लाख रुपये किंमतीचे मोबाईल येथून लंपास करण्यात आलेत. दुर्गेश डिगलाल गौतम असं दुकान मालकाचं नाव आहे. भिंत फोडून चोरी झाल्याने संपूर्ण गावात या घटनेची चर्चा सुरू आहे. (Latets Marathi News)

आमगावमच्या गांधी चौकात शिवणकर नावाची चाळ आहे. या चाळीत दुर्गेशने एक गाळा घेऊन तेथे आपलं मोबाईल शॉप सुरू केलंय. १ ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी मोबाईल फोन्सवर डल्ला मारला. रात्रीच्यावेळी सगळे झोपलेले असताना चोरट्यांनी मोबाईल शॉपची भिंत फोडली. भिंत फोडून त्यांनी सर्व महागडे मोबाईल फोन चोरी केली.

झालेल्या घटनेची रात्री कुणाला काहीच खबर लागली नाही. मोठ्या चतुराईने हाथचलाखीने मोबाईल चोरी केलेत. हे मोबाईल तब्बल ७ ते ८ लाख रुपयांच्या किंमतीचे असल्याचं दुकानदाराने सांगितलं आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दुर्गेश दुकानावर आला. त्यावेळी दुकान खोलताच त्याची अवस्था पाहून तो हादरून गेला.

आपल्या दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. पावसामुळे भिंत फोडलेल्या ठिकाणी पाणी साचल्याने तपासात थोड्या अडचणी येत आहेत. पोलिसांनी तेथील फिंगरप्रींट्स घेतल्या असून वेगाने तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT