Gondia Latest Marathi News Updates, Gondia Latest News in Marathi अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

फॉरेनची पाटलीन ! श्रीलंकेचं वऱ्हाड गोंदियामध्ये !

प्रेमविवाहाने श्रीलंका आणि भारत आला जवळ

अभिजित घोरमारे

गोंदिया : गोंदियात (Gondia) आली फॉरेनची पाटलीन! दिग्दर्शन प्रदीप गोंसाविकर यांची फॉरेनची पाटलीन हा सिनेमा आपण बघितलाच असेल, यात एक विशेष तरुणी भारतीय मुलाशी लग्न करते. गावाचा विकास घडवून आणायचे प्रयत्न करत असते. या सिनेमाला (cinema) साजेल, अशी हुबेहुब प्रसंग गोंदियात घडला आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या दतोरा गावातील (village) उमेश कांबळे या तरुणाने श्रीलंकेतील "रत्न मेनिके" या तरुणीशी प्रेमविवाह केला आहे. आता या जोडप्याने महाराष्ट्रात (Maharashtra) धम्माचा प्रसार- प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. यात गोंदियातील तरुणाने सातासमुद्रा पार गावातील तरुणी आपल्या गावात लग्न करून, आणल्याने कुतूहलाचा विषय बनला आहे. (Gondia Latest Marathi News)

हे देखील पाहा-

गोंदियाच्या दतोरा गावातील उमेश कांबळे हे रेल्वे विभागात नोकरीला असून, पेशाने शिक्षिका असलेल्या श्रीलंकेतील रत्न मेनिके या तरुणीशी २ वर्षाआधी फेसबुक वरून मैत्री झाली. त्यांचे प्रेम जुड़त २ महिन्याच्या आधीच लग्न करण्याचे ठरले. यासाठी दोघांनी आपआपल्या घरी लग्नाचा प्रस्ताव दिला आणि मग रत्न मेनिके यांनी भारतात येण्याचे ठरविले.

अखेर घरच्याची सहमती मिळवत उमेश आणि रत्न मेनिके यांचा १८ एप्रिलला श्रीलंकेतील बुकामुना गावात लग्न झाले आहे. दरम्यान उमेश व रत्न मेनिके यांचे लग्न गोंदियात परतताच घरच्यांनी स्वागत समारंभ करण्याची तयारी करत उमेश आणि रत्न मेनिके यांचा स्वागत समारंभ पार पाडला. आता त्यांनी महाराष्ट्रात धम्माचा प्रचार करत जीवन जगण्याचा निर्धार केला आहे.

दूसरीकडे आपल्या गावात आणि घरात फॉरेनची मुलगी आल्याने गावकऱ्यांना आणि उमेशच्या घरच्यांना देखील आनंद झाला आहे. तर उमेश आणि मेनिके या बुद्धिष्ठ असून त्यांना महाराष्ट्रात धम्माचा प्रचार करायचा असल्याने त्यांनी रत्न मेनिकेशी लग्न करण्याचे ठरविले आहे. आता गोंदियात या फॉरेनच्या पाटलीनची चर्चा होऊ लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT