Gondia Bike Accident Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Accident: लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायला जाणाऱ्या भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

Gondia Bike Accident: लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या एका भावाचा अपघातात मृत्यू झालाय. कागदपत्र घेण्यासाठी दुचाकीवरुन घरी जात असताना ट्रकने त्याला धडक दिली. हा अपघात गोंदियातील अर्जुनी मोरगावात घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुभम देशमुख, साम प्रतिनिधी

राज्य सरकारची नवी 'लाडकी बहीण योजने'चा फॉर्म भरायला गेलेल्या एका युवकाचा अपघात झालाय. कागदपत्र घेण्यासाठी गावी दुचाकीने जात असताना त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. योजनेसाठी एका लाडक्या बहिणीला आपला भाऊ गमवावा लागला आहे. शिवालाल लाडे वय ४२ वर्ष, असे अपघात मृत पावलेल्या भावाचं नाव आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे जुळविण्यासाठी नागरिकांच्या तहसील कार्यालयात फेऱ्या वाढल्या आहेत. तर कुणी महिला माहेरी जन्म दाखला आण्याला जायला निघाल्यात. मात्र अशा एका लाडक्या बहिणीचा भाऊ आपल्या बायकोला अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात घेऊन आला असता त्याच्या पत्नीने या योजनेचा एक कागद घरी विसरल्याने तो घाई घाईत एकटाच गावाला कागद आण्याला निघाला असता. त्याला रस्त्यावर एका ट्रकने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान लाडे यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रक चालकाला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केलीय.

योजनेसाठी कागदपत्रे घेण्यासाठी घरी जाताना अपघात झाला. योजनेच्या लाभ मिळावा म्हणून एका लाडक्या बहिणीला आपला भावाला गमवावा लागलाय. त्यामुळे तुम्हीदेखील कागदपात्रांची जुळवाजुळव करायला जात असाल तर वाहने हळू चालावा आणि वाहतूक नियमानाचे पालन करा. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता यापुढे तुम्ही ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत तुम्ही भरू शकता, त्यामुळे घाई करू नका कारण तुम्ही ३१ ऑगस्ट आधी फॉर्म भरले तरी तुम्हाला १ जुलै पासूनच या योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे धावपळ करत जाऊन स्वतःची जीवितहानी तर होणार नाही याची काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT