Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात लावले धान पीक; कुंभारटोली- पाऊलदौना रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन

Gondia News : गोंदियाच्या आमगाव नगरपरिषद अंतर्गत असलेल्या कुंभारटोली आणि पाऊळदौंना या गावाला जाण्याकरिता रस्ता अनेक वर्षापासून खराब झाला होता. या दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आली होती.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : कुंभारटोली - पाऊलदौना रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील अद्याप रस्ता झालेला नाही. याचा त्रास विद्यार्थ्यांना रोजच सहन करावा लागतो. यामुळे संतप्त झालेलय विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आंदोलन करत रस्त्याच्या कामासाठी विद्यार्थ्यांनी खड्ड्यांमध्ये भात पिकाची लागवड केली. 

गोंदियाच्या आमगाव नगरपरिषद अंतर्गत असलेल्या कुंभारटोली आणि पाऊळदौंना या गावाला जाण्याकरिता रस्ता अनेक वर्षापासून खराब झाला होता. या दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आली होती. परंतु अद्यापही या रस्त्याची दुरावस्था कायम आहे. पावसाळा सुरू असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले असते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये यायला मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतो. या मार्गावर अनेक अपघात सुद्धा झाली आहेत. विशेष म्हणजे याच मार्गाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे जाण्याकरिता मोठमोठे ट्रक धानाने आणि तांदळाने भरलेले जात असतात.  त्यामुळे हा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालीये आणि म्हणूनच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर बांधकाम करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

आमगाव शहरालगतच असलेल्या कुंभारटोली आणि पाऊळडौना या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन, निवेदन तहसीलदार मार्फत शासनात देण्यात आले. परंतु हा रस्ता बनत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांनी परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांवर धान पिकाची रोवणी करत आंदोलन केले. प्रशासक आणि शासनाला जागं करण्यासाठी आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि चांगल्या प्रतीच्या नवीन रस्ता बांधावा अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT