Shweta Kove wins gold medal in Asian Youth Para Games  saam tv
महाराष्ट्र

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

asian youth para games Dubai : दुबईतील एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीची श्वेता कोवे ही विद्यार्थिनी चमकली. आर्चरीमध्ये तिनं सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी तिचं कौतुक केलं.

Nandkumar Joshi

गडचिरोलीच्या श्वेताची वैश्विक भरारी

एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण, कांस्य पदक

श्वेताचे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुकाची थाप

गडचिरोली: वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईनं मोलमजुरी करून वाढवलं. कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. आईचं भक्कम पाठबळ आणि त्याला अथक मेहनत आणि जिद्दीची जोड या जोरावर गडचिरोलीच्या श्वेता कोवे हिनं जगाच्या नकाशावर महाराष्ट्रातील गडचिरोलीचं नाव 'सुवर्ण' अक्षरांनी कोरलंय. दुबईतल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये (Asian Youth Para Games) आर्चरी स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक आणि कांस्य पदकाची कमाई केलीय. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या श्वेताचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

दुबई येथे एशियन युथ पॅरा गेम्समध्ये भारतीय स्पर्धकांचा दबदबा दिसून आला. या स्पर्धेत भारतीयांनी गोल्डन कामगिरी केली. शंभरहून अधिक पदकांची कमाई केली. त्यात ३६ सुवर्ण, २८ रौप्य आणि ३८ कांस्य पदकांचा समावेश आहे. याच स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी तथा दिव्यांग खेळाडू श्वेता कोवे ही देखील सहभागी झाली होती. तिनं पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली. तिनं गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे अभिनंदन केले. तसेच कौतुकाची थापही दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात श्वेता कोवेच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि आत्मविश्वासाला सलाम करत तिचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले आहे. दुर्गम भागातून आलेल्या एका मुलीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकदार कामगिरी करत पदके पटकावणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत कौतुकही केले.

श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर विश्वास ठेवत श्वेताने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल १४ देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने सुवर्ण व कांस्य पदकावर नाव कोरले.

भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे श्वेताचे स्वप्न आहे. श्वेता कोवेच्या या यशामुळे दुर्गम व आदिवासी भागातील असंख्य मुला-मुलींना नवी दिशा, आशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. तिची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT