IPL Success Story: बापाची जिद्द, पोराची मेहनत, कर्ज काढून क्रिकेट खेळायला पाठवलं, शहापूरचा लेक IPLमध्ये खेळणार

Success Story of Onkar Tarmale in IPL 2026: शहापूरच्या ओंकार टरमळेची आयपीएलमध्ये वर्णी लागली आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना कर्ज काढून क्रिकेट खेळायला पाठवले. आईवडिलांच्या सपोर्टमुळे ओंकारने हे यश मिळवलं आहे.
IPL Success Story
IPL Success StorySaam Tv
Published On
Summary

शहापूरच्या लेकाची IPL मध्ये वर्णी

सनरायझर्स हैदराबादने केले खरेदी

३० लाखांच्या मूळ किंमतीवर केले खरेदी

लवकर आयपीएल २०२६ (IPL 2026) सुरु होणार आहे. यासाठी मंगळवारी २६ डिसेंबर रोजी लिलाव झाला. आयपीएल लिलावात शहापूरच्या ओंकार टरमेळेची वर्णी लागली आहे. एकीकडे अनेक स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले तर अनेक अनकॅप्ड खेळाडू्ंसाठी बोली लागली. शहापूरच्या ओंकार टरमेळेसाठीही बोली लागली होती.

काही अनकॅप्ड खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळाले तर काहींना त्याच किंमतीत खरेदी केले. ओंकार टरमेळादेखील सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) खरेदी केले आहे. हा एक गोलंदाच आहे. अवघ्या २३ व्या वर्षी त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

IPL Success Story
Success Story : जिद्द! नोकरी सोडली अन् यूपीएससी दिली, IPS साठी सिलेक्शन पण IRS ची केली निवड; नेहा नौटियाल यांचा प्रवास

कुटुंबाला आनंद

ठाण्याची शहापूरमधील ओंकारला सनरायझर्स हैदराबादने (SunRisers Hyderabad) ३० लाखांच्या मूळ किंमतीत खरेदी केले आहे. त्याने आतापर्यंत अनेक स्तरावर आपले कौशल्य दाखवले आहे. तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी (Balling) ओळखला जातो. घरची बेताची परिस्थिती, मध्येच क्रिकेट सोडण्याचाही विचार होता. परंतु मोठ्या जिद्दीने काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा होती, असं ओंकारने सांगितलं.

वडिलांनी घेतले कर्ज

ओंकारसाठी हा प्रवास सोपा नव्हता. परंतु त्याचे आईवडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे सोबत होते. ओंकारच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडिलांनी लोनेदेखील घेतली आहे. ओंकार हा अनेक ठिकाणी जाऊन खेळला आहे. तो दिल्लीलादेखील गेला होता. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. परंतु त्याला त्रिपुराला जायचे होते. यासाठी त्याच्या वडिलांनी तीन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर तो त्रिपुराला गेला.

ओंकारच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्यासाठी महाराष्ट्र प्रिमियल लीग हे कलाटणी देणारे ठरले. त्यानंतर त्याला भरारी मिळाली. ओंकार महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि मुंबई प्रीमियर लीग खेळला आहे. तो सुरुवातीला टेनिस बॉलने खेळला.त्यानंतर लेदर बॉलकडे वळला. यानंतर त्याच्या दमदार कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले.

IPL Success Story
Success Story: जिद्द! वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी IAS झाल्या; कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक; गरिमा लोहिया यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com