

IAS गरिमा लोहिया यांचा प्रेरणादायी प्रवास
दुसऱ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक
खूप खडतर परिस्थितीतून केली यूपीएससी क्रॅक
अनेकदा परिस्थिती आपल्याला हवी तशी नसते. परंतु परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यावर मात करता यायला हवी. संघर्षातूनच माणूस मोठा होता.असंच काहीसं गरिमा लोहिया यांच्यासोबत झालं. त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले.
गरिमा लोहिया यांचे शिक्षण
गरिमा लोहिया या बक्सरमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले. त्यांनी बक्सरमधील वुट स्टॉकमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी सनबीम भगवानपुरमधील १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील किरोडीमल कॉलेजमधून बीकॉम डिग्री प्राप्त केली.
गरिमा लोहिया यांच्या वडिलांचा बक्सर जिल्ह्यात कपड्यांचा व्यापार होता. त्यांच्या लेकीने सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करावे, असे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरिमा यांनीदेखील खूप मेहनत घेतली.
दरम्यान, यूपीएससी परीक्षेच्या काळात २०१५ मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, वडिलांचे निधन झाल्याच्या दुःखातून त्या सावरल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांच्या आईने संपूर्ण कुटुंबाला सावरले. गरिमा यांचे आयएएस होण्याचे स्वप्नदेखील तुटले होते. परंतु त्यांच्या आईने त्यांना सावरले. जेव्हा गरिमा रात्र-रात्रभर अभ्यास करायच्या. तेव्हा त्यांच्या आईदेखील जागायच्या.
कोणत्याही क्लासेसशिवाय मिळवलं यश
गरिमा यांनी दिल्लीत राहून यूपीएससीसाठी कोचिंग क्लासेस लावायचे होते. मात्र, कोरोनामुळे त्यांना हे करता आले होते. यामुळे त्या पुन्हा आपल्या घरी बक्सर येथे आल्या. यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केला. त्यांनी युट्यूबवरुन परिक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात गरिमा यांना अपयश मिळाले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. त्यांनी ऑल इंडिया २ रँक प्राप्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.