Monday Horoscope: जोडीदारासोबत संबंध सुधारतील, ४ राशींना कामामध्ये यश मिळण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज सफल एकादशी आहे. मनातील इच्छा सफल होण्याचा दिवस आहे. जोडीदाराबरोबर एखादा नवीन संकल्प कराल. व्यवसाय जोमात चालेल.

Mesh | saam tv

वृषभ

खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जसे की पोटदुखी या वाढू शकतील. आपल्या जवळच्या लोकांना पासून सावधगिरी बाळगा.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

आज सफला एकादशी आहे. आपल्या राशीला विष्णू उपासना शतपटीने अधिक फल देईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

शेतीचा व्यवसायात नवीन तंत्र, मंत्र अवलंबाल.आपला आदर्श इतर काही लोक घेऊन पुढे जातील. सहज सोप्या गोष्टीने यशाकडे झेप घ्याल.सर्व सुखकारक दिवस आहे.

कर्क | Saam TV

सिंह

मत भिन्नता सोडून आपल्या जवळच्या व्यक्तींची गोड बोलायला हवे. शेजारील लोकांकडून वेळेला सहकार्य मिळेल. इतरांच्या काही जबाबदाऱ्या घेऊन आज त्या आपल्याला पेलाव्या लागतील.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

पैशाला पैसा वाढण्याचा आजचा दिवस आहे. व्यवसायामध्ये सतर्कता बाळगावी लागेल. जुन्या गुंतवणुकीतून खेळता पैसा वाढीस लागेल.

kanya | saam tv

तूळ

दिवस चांगला आहे. स्वतःसाठी जगताना दानधर्म, उदारता, समोरच्याच्या चांगल्या गुणांची पारख असणे या गोष्टी आज कराल.

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

कामाची दगदग वाढेल. अर्थात विचारांची दिशा बदलली तर नकारात्मकता बाजूला टाकून जे चांगलं होतं त्यावर विचार करा. दूरचे प्रवास होतील. कष्टाच्या मानाने फळ मिळेल असा दिवस नाही.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

प्रेमाला वेगळेच वळण लागेल. पैशाशी निगडित लाभ होतील. सून जावयाच्या स्नेहात आनंद वाटेल. मित्र-मैत्रिणी मदत करतील. दिवस चांगला आहे.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

सामाजिक क्षेत्रात ऊठबस होईल. कामाला काम वाढेल. आपला लोकसंग्रह चांगला आहे. जिद्द चिकाटी न सोडता आपले कामाचे क्षेत्र वाढीव कराल.

मकर | Saam Tv

कुंभ

आज सफला एकादशी. विष्णू उपासना मनाला आनंद देणारी ठरेल. मोठ्या प्रवासाची योगही येतील. जवळच्या लोकांकडून, संततीकडून फायदा संभवतो आहे.

कुंभ | Saam Tv

मीन

मोठ्या प्रकारचा धनलाभ होण्याचे आज योग आहेत. जसे काही घबाड मिळाले. पण आपल्या साधेपणामुळे कुठे फसले जाणार नाही ना, याची काळजी घ्या.

Meen Rashi | Saam TV

NEXT: Eyelash Growth Care: सुंदर, लांबसडक पापण्यांसाठी फक्त 4 सिंपल टिप्स करा फॉलो

Eyelash Growth Tips
येथे क्लिक करा