Gold and Silver Price Saam TV
महाराष्ट्र

Gold- Silver Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याच्या दरात ४००० रुपयांची घसरण, वाचा सुवर्णनगरीत आजचा भाव किती?

Gold and Silver Price Drop: जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचे दर ४००० रुपयांनी आणि चांदीचे दर ५००० रुपयांनी घसरले. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? ते वाचा सविस्तरत..

Priya More

Summary -

  • जळगावमध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

  • सोनं ४ हजारांनी आणि चांदी ५ हजारांनी स्वस्त झालं

  • सध्या सोन्याचा दर १,१७,८०० प्रति १० ग्रॅम तर चांदीचा दर १,४४,००० प्रति किलो झाला

  • लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीची सुवर्णसंधी

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. दिवाळीमध्ये सोनं-चांदीचे दर प्रचंड वाढले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. पण आता सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात ४००० रुपयांनी आणि चांदीच्या दरात ५००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोनं-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी सुवर्णनगरीत गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात यूएस आणि चीन यांच्यातील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावात थोडी स्थिरता आल्याने आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज दुपारच्या सत्रात सोन्याचा दर एका तासांत तब्बल ४ हजार रुपयांनी खाली आला. तर चांदीचा दर ५ हजार रुपयांनी घसरल्याची नोंद झाली.

सध्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर १,१७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा दर १,४४,००० रुपये प्रति किलो असा आहे. जीएसटीसह सोन्याचे दर १,२१,००० रपये आणि जीएसटीसह चांदीचे दर १,४८,००० रुपये इतके झाले आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांचा सोनं-चांदी खरेदीकडे कल वाढला आहे.

लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा सुवर्णनगरीत सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. स्थानिक सराफ व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थितीत स्थैर्य आल्यास दरात आणखी काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकते. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT