Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Today Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर गगनाला भिडले; प्रति तोळा १ लाख ७८ हजारांवर गेले; वाचा २२k, २४k दर

Today Gold Price: जळगाव सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे खरेदीदार दूर झाले आहेत.

Alisha Khedekar

  • सोन्याच्या दरात ४,७०० रुपयांची मोठी वाढ

  • चांदीच्या भावात २३ हजारांची वाढ

  • सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण

  • सामान्य ग्राहकांची खरेदी घटली

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. जळगाव, येथील सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावात २७ जानेवारी, मंगळवारी पाच हजारांची घट झाली होती. २८ जानेवारी, बुधवारी पुन्हा २३ हजारांची, तर सोन्याच्या भावात चार हजार ७०० रुपयांची वाढ झाली. जणू भाववाढीचा उच्चांक झाला. यामुळे सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण आहे. शिवाय खरेदीदारांची देखील सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

सोने-चांदी आता सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मात्र, श्रीमंत गुंतवणूक करीत आहेत. मंगळवारी सोन्यात ७०० रुपयांची घट होऊन सोने जीएसटी शिवाय एक लाख ५९ हजार ३०० रुपयांवर पोचले. 'जीएसटी' सह सोने एक लाख ६४ हजार ७९ रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम) पोहोचले होते. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ११,७७० रुपयांनी वाढले आहेत, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १०,८८० रुपयांनी वाढले आहेत.

बुधवारी सोन्यात चार हजार ७०० रुपयांची वाढ झाली. सोने 'जीएसटी'सह एक लाख ६८ हजार ९२० वर (प्रतिदहा ग्रॅम) पोहोचले. मंगळवारी चांदी 'जीएसटी तीन लाख ५५ हजार ३५० रुपयांवर पोहोचली होती. बुधवारी चांदीत २३ हजारांची वाढ होऊन 'जीएसटी' सह तीन लाख ७९ हजार ४० रुपयांवर (प्रतिकिलो) पोहोचली.

सोने आणि चांदीचे दर

  • २४ जानेवारी रोजी सोन्याचे दर १,४४,९०० रुपये आणि चांदीचे दर ३,४०,००० रुपये होते

  • २६ जानेवारी रोजी सोन्याचे दर १,६०,००० रुपये आणि चांदीचे दर ३,५०,००० रुपये किलो होते

  • २७ जानेवारी रोजी सोन्याचे दर १,५९,३०० रुपये आणि चांदीचे दर ३,४५,००० रुपये किलो होते

  • २८ जानेवारी रोजी सोन्याचे दर १,६४,००० रुपये आणि चांदीचे दर ३,६८,००० रुपये प्रति किलो

  • २९ जानेवारी रोजी सोन्याचे दर १. ८० हजार रुपये आणि चांदीचे दर ४ लाख रुपये प्रति किलो आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News: साध्वी प्रेम बैसा यांचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओ, ब्लॅकमेलिंग की इंजेक्शन...? चार तासांनंतर सापडली सुसाईड नोट

Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT