Gold Rate Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate: आनंदाची बातमी! सराफा बाजारात सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले, चांदीचीही चकाकी उतरली

Gold Rate Drop: सोन्याचे दर वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले आहेत. याचसोबत चांदीचेही दर घसरले आहेत.

Siddhi Hande

सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर ९०० रुपयांनी तर चांदी ७००० रुपयांनी घसरली

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी

सोने चांदीचे दर अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. अनेकांना नवीन वर्षात सोन्याचे दर कमी होती, अशी आशा होती. मात्र, हे दर वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे सध्या सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. मात्र, आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत.

सोने-चांदीचे दर घसरले (Gold Silver Rate Fall)

सोने-चांदीचे भाव वाढलेले असतानाच आता गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सोन्यात ९००, तर चांदीत सात हजारांची घट पाहायला मिळाली. जळगाव येथील सराफा बाजारात दोन दिवसांपासून भाववाढीचा चढता आलेख पाहायला मिळाला. मात्र, गुरुवारी ८ जानेवारी रोजी सोने-चांदीचे भाव अचानक गडगडले.

सोन्यात प्रति दहा ग्रॅमला म्हणजेच १ तोळ्यामागे ९०० रुपयांची तर चांदीत प्रतिकिलो सात हजारांची घट झाली आहे. याचसोबत यावर जीएसटीदेखील आकारला जातो.अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने मोठे आयातशुल्क लावण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.अमेरिकेतच डिसेंबरमधील रोजगाराची आकडेवारी प्रसिद्ध झाल्याने त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावासह शेअर बाजारही गडगडला.

दोन दिवसांपूर्वीचे सोन्याचे दर

सोन्याचा भाव दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी १ तोळ्यामागे एक लाख ३६ हजार ७०० रुपये होता. त्यात आज नऊशे रुपयांची घट होऊन सोने एक लाख ३५ हजार ८०० वर पोहोचला. चांदीचा भाव प्रतिकिलो दोन लाख ४८ हजार होता. त्यात गुरुवारी सात हजारांची घट होऊन चांदी दोन लाख ४१ हजारांवर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

Corn Silk Tea : मक्याच्या केसांचा चहा कधी प्यायलात का? किडनीपासून शुगरपर्यंत आजार होतील दूर

SCROLL FOR NEXT