Silver Rate : ... तर चांदी एक लाखांनी स्वस्त होणार, तज्ज्ञांचा अंदाज

Alisha Khedekar

चांदी स्वस्त होणार

मागील काही वर्षांपासून चांदीची किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. चांदी सध्या प्रति किलो अडीच लाखांवर पोहचली आहे. पण पुढील काही दिवसांत चांदीच्या किंमती स्वस्त होणार असल्याचा अंदाज आहे.

Silver | Saam Tv

चांदीची किंमत घसरली

चांदीची किंमतीने उच्चांक गाठल्यानंतर आता घसऱण होत आहे. आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत $८२.६७० प्रति औंसवरून $७१.३०० वर आली आहे.

Silver Jewellary | saam tv

आठवड्यात १३.७५ टक्क्यांनी स्वस्त

म्हणजेच आठवड्यात चांदीची किंमत १३.७५ टक्क्यांनी म्हणजेच $११.३७ ने घसरली आहे. पुढील काही दिवसांत चांदीची किंमत आणखी घसरणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

Silver Braslet | Saam Tv

१ लाखांनी चांदी स्वस्त होणार -

देशांतर्गत बाजारात चांदीची किंमत प्रति किलो अडीच लाखांच्या घरात पोहचली आहे. पुढील काही दिवसांत ६० टक्क्यांनी घसरल्यास चांदीची किंमत प्रति किलो एक लाखांनी कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ञांचा आहे.

Silver Ring | Saam tv

चांदीची किंमत का वाढली?

मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत चांदीच्या किंमती वाढल्या. १ जानेवारी २०२६ पर्यंत चीनने चांदीच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

Silver rate | Saam Tv

सॅमसंगमुळेही किंमती वाढल्या

सॅमसंगने लिथियम-आयन बॅटरीला पर्याय म्हणून सॉलिड-स्टेट बॅटरी शोधल्या. त्यात चांदीचा वापर होते. त्यामुळेही चांदी वाढली होती.

Samsung Phone | Saam Tv

चांदी का स्वस्त होणार ?

चीनने १ जानेवारी २०२६ पर्यंत चांदीच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे जागतिक बाजारात चांदीचा तुटवडा वाढला होता. त्यामुळे चांदीच्या किंमती वाढल्याचे बोलले जातेय. २०२७ च्या अखेरीस चांदीची किंमत ६० टक्के कमी होऊ शकते.

Silver Jwellery | Saam Tv

चांदी स्वस्त होण्याचं हेही कारण...

अनेकदिवसांपासून गुंतवणूकदारांनी चांदी साठवून ठेवली आहे ते आता ती विकत आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात चांदी उपलब्ध झाली आहे.

silver jewellary | saam tv

२०२५ मध्ये १८० टक्क्यांनी चांदी महागली

२०२५ मध्ये चांदीच्या किंमतीने उच्चांक गाठला होता. वर्षभरात चांदीची किंमत १८० टक्क्यांनी महागली होती.

Silver Jewellary | Saam Tv

NEXT : सोने पिवळ्या रंगाचेच का असते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Colour | saam Tv
येथे क्लिक करा