Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात दसऱ्याच्या दिवशी मोठी घसरण झाली. सोन्याचे दर घसरून देखील ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली.

Priya More
  • जळगावमध्ये दसऱ्याच्या दिवशी सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली

  • सोनं स्वस्त होऊन देखील ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली

  • जळगावमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या खरेदीत घट

संजय महाजन, जळगाव

जळगाव दसऱ्यानिमित्त दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या शहरातील सुवर्ण बाजारपेठेत यंदा अपेक्षित तेजी दिसून आली नाही. दुष्काळी परिस्थिती, खरीप हंगामातील पिकांचे घटलेले उत्पादन आणि सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम बाजारपेठेवर झाला. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी साधारणतः १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा दरात घसरण होऊनही सामान्य ग्राहकांनी दागिने खरेदीकडे पाठ फिरवल्याने उलाढालीत सुमारे १५ टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांचे घटलेले उत्पादन यामुळे शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने अनेक कुटुंबांनी सणासुदीच्या खर्चाला मर्यादा घातल्या. परिणामी, दसऱ्याच्य मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सुवर्ण बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामीण ग्राहकांची संख्या तुलनेने कमी राहिली.

दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षी या दिवशी दागिने, सोन्याची नाणी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी होते. यंदा मात्र बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली. आर्थिक परिस्थितीचा विचार करून अनेकांनी खरेदी पुढे ढकलली. तर काही ग्राहकांनी आवश्यकतेनुसार जळगावात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १ हजार ८४७ रुपयांहून अधिक घट झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार ३०८ रुपयांपर्यंत खाली आला.

चांदीच्या दरातही प्रति किलो ३ हजार ९० रुपयांची घसरण झाली. परिणामी, जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो २ लाख १६ हजार ३०० रुपयांवर आला. सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी मानली जात होती. मात्र, प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले, तरी दागिने खरेदीसाठी लागणारी एकूण रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची भावना ग्राहकांमध्ये होती. त्यामुळे दरातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहक पुढे आले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये स्वामी समर्थ मंदिरात चोरी; दर्शन घेतल्यानंतर महिलेने चांदीच्या वस्तू लंपास केल्या

Jowar vs Bajra vs Ragi: ज्वारी, बाजरी की नाचणी? कोणत्या पिठात किती कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन; जाणून घ्या फरक

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT