

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण
२४ कॅरेटचे १० तोळा सोनं ८,७०० रुपयांनी स्वस्त
आज २२ आणि १८ कॅरेटचे सोन्याचे दर घसरले
आज चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज दसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. आज सोनं-चादी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८७० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४७,१७० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,७१,७०० रुपये खर्च करावे लागतील. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३४,९०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८००० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,४९,००० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात त्यामुळे आज तुम्ही २२ कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ६५० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१०,३८० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं ६,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,०३,८०० रुपये खर्च करावे लागतील. आज सोनं स्वस्त झालं पण चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदीचे दर २३० रुपये आहे. तर १ किलो चांदी २,३०,००० रुपयांना विकली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.