ITR Deadline 2026 : 21 नोव्हेंबरपूर्वी ही 3 कामं करा! एक चूक पडेल महागात, भरावा लागू शकतो दंड

Income Tax Return : आयटीआर भरणाऱ्या ऑडिटअंतर्गत येणाऱ्या करदात्यांसाठी २१ नोव्हेंबर २०२६ अंतिम तारीख आहे.
ITR Deadline 2026
ITR Deadline 2026 saam tv
Published On: 

आयकर रिटर्न (ITR) भरणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑडिट अंतर्गत येणाऱ्या कंपन्या, LLP आणि इतर करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी आता २१ नोव्हेंबर २०२६ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. कारण आयटीआर भरताना एखादी छोटी चूक झाली, तरी पुढे दंड किंवा व्याज भरावं लागू शकतं. त्यामुळे रिटर्न दाखल करण्याआधी तीन महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्या.

1. टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि UDIN तपासा

आयटीआर भरण्याआधी तुमचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट वैध UDIN सोबत सादर झाला आहे का हे तपासा. ऑडिटनंतर कलम 43B अंतर्गत पेमेंटमध्ये बदल झाल्या असेल तर नियम 6G नुसार ऑडिट रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करा. यामुळे रिटर्नमध्ये चुकीची माहिती जाण्याची शक्यता कमी होईल.

ITR Deadline 2026
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट? पगार, पेन्शन अन् HRA मध्ये बंपर वाढीचा प्रस्ताव

2. PAN-Aadhaar लिंक आणि बँक खातं तपासा

तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे का, हे आधी तपासा. त्याचबरोबर आयकर विभागाच्या पोर्टलवर रिफंड मिळणारं बँक खातं प्री- व्हॅलिडेट आणि नॉमिनेट करा. कंपन्या आणि बऱ्याच ऑडिट प्रकरणांमध्ये वैध डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) तयार ठेवणंही महत्त्वाचं आहे.

ITR Deadline 2026
Modi Cabinet Decisions : शेतकऱ्यांपासून महिला उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारचे ५ निर्णय जाहीर

3. AIS, TIS आणि Form 26AS मधील माहिती जुळवा

आयटीआर दाखल करण्याआधी AIS, TIS आणि Form 26AS मधले उत्पन्न, व्याज आणि TDS ची माहिती तपासा. चुकीची किंवा डुप्लिकेट नोंद आढळल्यावर त्यावर फीडबॅक द्या. तसेच ई-कॅम्पेनचे अलर्ट तपासून महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत उत्तर द्या.

ITR उशिरा भरल्यास दंड किती?

आयटीआर दाखल केल्यावर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. मुदतीत व्हेरिफिकेशन न केल्यावर रिटर्न उशिरा दाखल झाल्याचं मानलं जाऊ शकतं. मुदर चुकल्यावर कलम 234F अंतर्गत लेट फी आणि कलम 234A अंतर्गत दरमहिन्याला १ टक्के व्याज लागू होऊ शकतं. असेसमेंट इयर 2026-27 साठी बिलेटेड रिटर्नची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.