सुवर्ण पदक विजेत्या नीरजचा घरी जाऊन सत्कार करणार- खा.संभाजीराजे  SaamTv
महाराष्ट्र

सुवर्ण पदक विजेत्या नीरजचा घरी जाऊन सत्कार करणार- खा.संभाजीराजे

टोकियोत ऑलिम्पिकच्या प्रांगणात जवळपास अकरा वर्षांनी भारताच्या राष्ट्रगीताचा आवाज घुमल्यानं देशभरातून कौतुक होत असताना सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : टोकियोत ऑलिम्पिकच्या प्रांगणात जवळपास अकरा वर्षांनी भारताच्या राष्ट्रगीताचा आवाज घुमल्यानं देशभरातून कौतुक होत असताना सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे. महाराष्ट्र क्रांती मोर्चाने तर अभिनंदनाचा ठराव करून सत्कार करण्याची घोषणाही केली आहे. मात्र खेळाडूंना जातीच्या चौकटीत अडकवणे कितपत योग्य हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.Gold medalist Neeraj will be felicitated at home

नीरज चोप्रा तमाम भारतीयांनी मान ज्याच्या सुवर्ण कामगिरीने उचवाली तो खेळाडू मात्र नीरजची जात शोधून त्याचं महाराष्ट्र कनेक्शनहीMaharashtra Connection जोडलं गेलंय. विशेष म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरुन रोड मराठाMaratha असलेल्या नीरजच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्रात नीरजचा लवकरच सत्कारदेखील होणार आहे. मराठा क्रांती मोर्चा मात्र तो रोड मराठाMarathaRoad असल्याचा अभिमानही आहे असं क्रांती मोर्चा तर्फे सांगण्यात आलं आहे.

एकीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर अभिनंदनाचा ठराव Congratulations resolution करुन सत्काराची घोषणा झाली तर त्याच व्यासपीठावर खासदार संभाजीराजे यांनी नीरजचा सत्कार तो भारतात आल्यावर लगेचच घरी जाऊन करणार, अशी घोषणा केली.

प्रत्येक वेळी कुणालाही पदक मिळालं की त्या खेळाडूच्या राज्य, भाषा, जात, धर्म या सगळ्या गोष्टींच्या चर्चेला सुरुवात होते. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची सध्या गरज आहे. सध्या नीरजला कुणी ब्राह्मण म्हणतं तर कुणी मराठा तर कुणी काय म्हणतं, नीरज हा कोणत्या जातीचा आहे यापेक्षा तो भारतीय खेळाडू आहे आणि त्यानं भारताचं नाव रोषण केलंय हे खरं आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT