Gold Price  Saam TV
महाराष्ट्र

Gold Price: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला चकाकी, पाहा तुमच्या शहरात आजचा सोन्याचा दर किती?

New Financial Year Kicks Off with Gold Price Hike: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सोन्याच्या दरात वाढ. ३१ मार्चच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीने उच्चांक उडी घेतली आहे.

Bhagyashree Kamble

आज १ एप्रिल २०२५. नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभासोबतच सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. ३१ मार्चच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीने उच्चांक उडी घेतली आहे. सोन्याच्या प्रति तोळा किमतीत ९०० रूपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ९२,००० रूपये इतके आहे. तर, मुंबईत सोनं प्रति तोळ्याची किंमत ९१,९०० इतकी आहे. तर, चांदीचा दर १,०३,९०० रूपये प्रति किलो आहे. चांदीच्या किमतीत कोणाताही मोठा बदल झालेला नाही.

दिल्ली मुंबईत सोन्याचा दर

मंगळवार, १ एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८४,४१० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९२,०७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत सोन्याचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ८४,२६० रूपये तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९१,९२० रूपये प्रति १० ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत ९०० रूपयांची वाढ झाली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार तुमच्या शहरातील पाहा सोन्याचा दर

मुंबई- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८१,१७० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८१,१७० प्रति १० ग्रॅम आहे.

नागपूर- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८१,१७० प्रति १० ग्रॅम आहे.

नाशिक- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ८१,१७० रूपये इतके आहे.

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारी टॅक्स आणि रूपयाच्या मुल्यातील चढउतार, अशा अनेक कारणांमुळे भारताच्या सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही, तर ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: लग्न आणि सणांमध्ये त्याची मागणी वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT