Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ४००० तर चांदी १०००० रुपयांनी स्वस्त

Gold- Silver Price Today: सोनं- चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. आठवडाभरामध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोनं-चांदीचे दर किती घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण

  • आठवडाभरात सोनं ४ हजारांनी स्वस्त

  • चांदीच्या दरात १० हजार रुपयांची घसरण

  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं- चांदीच्या खरेदीसाठी गर्दी

संजय महाजन, जळगाव

अमेरिका- इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे. या युद्धामुळे सराफा बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ८ दिवसांत सोनं, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. या आठवडाभरामध्ये सोन्याच्या दरामध्ये ४ हजार रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये १० हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्यासह चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

२०२३ मध्ये युक्रेन-रशिया युध्द सुरू असताना सोनं, चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत होती. आता मात्र इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युध्दादरम्यान सोनं, चांदीच्या भावात सातत्याने घसरण होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. ९ मार्चला सोन्याचा भाव प्रतितोळा १ लाख ६० हजार रुपये होता. आज सोन्याचा भाव १ लाख ५६ हजार रुपयांवर आला आहे.

तर ९ मार्चला १ किलो चांदीचा भाव २ लाख ६६ हजार होता. आज चांदीचा भाव २ लाख ५६ हजार रुपये झाला आहे. आगामी काळात गुढीपाडवा आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनं, चांदीच्या भावात घसरण होते का वाढ होते? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते.

६ दिवसांतील सोन्याचे प्रति तोळा भाव -

७ मार्च - १ लाख ६१ हजार २००

९ मार्च - १ लाख ६० हजार

१० मार्च - १ लाख ६० हजार ५००

११ मार्च - १ लाख ६० हजार ६००

१२ मार्च - १ लाख ६० हजार ३००

१३ मार्च - १ लाख ५८ हजार ५००

१४ मार्च - १ लाख ५७ हजार ५००

१६ मार्च - १ लाख ५६ हजार

६ दिवसांतील चांदीचे १ किलोचे भाव -

७ मार्च - २ लाख ६८ हजार

९ मार्च - २ लाख ६६ हजार

१० मार्च -२ लाख ७८ हजार

११ मार्च - २ लाख ७४ हजार

१२ मार्च - २ लाख ७० हजार

१३ मार्च - २ लाख ६५ हजार

१४ मार्च - २ लाख ६० हजार

१६ मार्च - २ लाख ५६ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT