गोकुळ दूध संघाची उलाढाल ₹३,९६६ कोटींपर्यंत पोहोचली.
शेतकऱ्यांना दूध दर फरक व बोनस जाहीर.
चीज आणि आईस्क्रीम हे दोन नवे प्रॉडक्ट बाजारात आणण्याचा निर्णय.
गोकुळनं २५ लाख लिटर दूध संकलनाचं लक्ष्य ठेवले.
कोल्हापुरात आज दुपारी १ वाजता गोकूळ दूध संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह इतर संचालकांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार सतेज पाटील देखील उपस्थितीत होते. यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मोठे निर्णय घेण्यात आले. सभेत अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी जाहीर केलं की, गोकुळ लवकरच बाजारात चीज आणि आईस्क्रीम हे २ नवे प्रॉडक्ट आणणार आहे.
गोकुळ दूध सभेत वार्षिक उलाढाल, भांडवल आणि नव्या प्रॉडक्टबाबत माहिती देण्यात आली.
उलाढाल:- संघाची उलाढाल मार्च २०२४ अखेर रु.३ हजार ६७० कोटी इतकी होती, ती मार्च २०२५ अखेर रु.३ हजार ९६६ कोटी इतकी झाली आहे. म्हणजेच जवळजवळ ४ हजार कोटी इतकी झाली आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत रु.२९६ कोटीने वाढ झाली आहे.
भाग भांडवल ७७ कोटी ९८ लाख इतके झाले आहे. वसूल भाग भांडवलामध्ये रुपये १ कोटी ७४ लाखाने वाढ झालेली आहे.
संस्थाची मागणी आणि जिल्ह्यातील नेत्यांची सूचना विचारात घेऊन आजपासून यामध्ये वाढ करुन म्हैस वास दूधास १२ रुपये आणि गाय वास दूधास ८ रुपये इतका दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वासाचे दूध म्हणजे दूध संघाला शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले पण खराब झालेले दूध )
दूध दर फरक: अंतिम दूध दर फरक म्हैस दूधासाठी सरासरी रू. २.४५ प्रतिलिटर आणि गाय दूधासाठी सरासरी रू.१.४५ प्रतिलिटर इतकी रक्कम उत्पादकांना देण्यात येणार आहे. अंतिम दूध दर फरकामध्ये हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादकांना २० पैसे जादा दूध दर फरक देण्यात आला आहे. तो जादा दिलेला दर वरील अंतिम दूध दर फरकामध्ये समाविष्ट केलेला आहे.
गोकुळ नजीकच्या काळात २० लाख लिटरचा टप्पा पार करत असून, पुढील २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दीष्ट ठेवले आहे, अशी माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली आहे.
यावेळी नव्या प्रॉडक्टबाबत माहिती देण्यात आली. गोकूळ आता बाजारात चीज आणि आईस्क्रीम हे २ नवे प्रॉडक्ट आणणार असल्याची माहिती नवीद मुश्रीफ यांनी दिली. 'गोकूळनं या सभेत मोठा निर्णय घेतला आहे. गोकूळ लवकरच चीज आणि आईस्क्रीम हे २ नवे प्रॉडक्ट बाजारात आणणार आहे', असं नवीद मुश्रीफ म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.