शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Maharashtra Cabinet: शेतकऱ्यांना उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलत मार्च २०२७ पर्यंत वाढवली. नागरी पायाभूत सुविधा विकासासाठी हुडकोकडून २,००० कोटी कर्ज उभारणीस मान्यता.
CM Devendra Fadnavis  File Pic
Devendra Fadnavissaam tv
Published On
Summary
  • शेतकऱ्यांना उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलत मार्च २०२७ पर्यंत वाढवली.

  • नागरी पायाभूत सुविधा विकासासाठी हुडकोकडून २,००० कोटी कर्ज उभारणीस मान्यता.

  • अकोला जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प दुरुस्तीमुळे सिंचन क्षमतेत वाढ.

  • रायगड जिल्ह्यात इंटेलिजन्स ब्युरोसाठी ४ हेक्टर जमीन निवासी प्रकल्पासाठी मंजूर.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (९ सप्टेंबर २०२५) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच ४ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. यासह मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी रूपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

(ऊर्जा विभाग)

शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ.

(नगरविकास विभाग)

नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २,००० कोटी रुपये कर्ज उभारणीस मान्यता.

कर्जाचा वापर :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी – ८२२ कोटी रुपये

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ४ मलनिस्सारण प्रकल्पांसाठी – २६८ कोटी रुपये

मीरा-भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी – ११६ कोटी रुपये

CM Devendra Fadnavis  File Pic
तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

(मृद व जलसंधारण विभाग)

अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता. मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार, शेतीला पाणी, शेतकऱ्यांना फायदा.

CM Devendra Fadnavis  File Pic
'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

(महसूल विभाग)

रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने (रहिवास क्वार्टर्स) बांधण्यासाठी देण्यास मान्यता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com