going to visit amboli ghat waterfall know the new rules and regulations  Saam Digital
महाराष्ट्र

पर्यटकांनाे! आंबोली घाटात धबधबा पाहण्यासाठी जाणार आहात? वाचा नवा नियम

Amboli Water Falls, all you need to know before visitng it: वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून धबधबा व घाट परिसरात टाकण्यात आलेला कचरा गोळा करून 1 टन कचरा हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात सुपूर्द करण्यात आला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना आता घाट व धबधबा परीसरात स्वच्छता राखावी लागणार आहे. अन्यथा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबराेबरच येथील प्राण्यांना विशेषत: माकडांना (वानर) खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आली. सावंतवाडी वनविभागाने नुकतीच आंबाेली घाटात व धबधबा पाहण्यास येणा-यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

सावंतवाडी वन विभागाच्यावतीने आंबोली घाट व धबधबा परिसराची नुकतीच स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत वनविभाग व स्थानिक स्टाॅलधारक व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

दरम्यान वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना आता घाट व धबधबा परीसरात स्वच्छता राखण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

अशी आहे नियमावली

आंबोली घाटात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई हाेणार.

एक हजार रूपये दंडाची तरतूद.

माकड (वानर) यांना खाऊ घालण्यावर बंदी.

खाऊ देताना आढळल्यास एक हजार रूपयांचा दंड भरावा लागणार.

राखीव संवर्धन क्षेत्रात दंगा, गाेंधळ करु नये.

आंबोली घाटातील जैवविविधता टिकविण्याची पर्यटकांवरही जबाबदारी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT