girls birth rate down Saam TV
महाराष्ट्र

Girls Birth Rate: छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचा जन्मदर घसरला; जालना जिल्हा डेंजर झोनमध्ये, वाचा आकडेवारी...

Girls Birth Rate 2024: आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात लक्षणीय घट झाली आहे.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Girls Birth Rate

'मुलगा हा वंशाचा दिवा' असा अट्टहास आजही अनेकांच्या मनात आहे. याच अट्टाहासापैकी तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झालंय. कारण, मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदराचं प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात लक्षणीय घट झाली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सद्य स्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार मुलांमागे ९१० मुली आहेत. परंतु गतवर्षी हेच जन्मदराचे प्रमाण ९२२ इतके होते. त्यामुळे यंदाच्या वर्षात मुलींच्या जन्मदरात लक्षणीय घट झाली असून ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi News)

सरकारने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कठोर कायदे केले असले, तरी प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांकडून त्या कायद्यांची पुरेपूर अंमलबजावणी होत नसल्याचे यातून दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात एका कारद्वारे फिरते गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस आले होते.

पोटात वाढणारा गर्भ हा मुलाचा आहे की मुलीचा आहे, हे तपासण्यासाठी गर्भनिदान चाचण्या आणि अवैधरित्या केलेले गर्भपात, अशा अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. सद्यस्थितीत मुलींचा जन्मदर घसरल्याने गर्भलिंगनिदान चाचणी केली तर जात नाही ना? असा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यातही मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट झाली आहे. मागील ५ वर्षांपासून जालना येथील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी एक हजार मुलांमागे जवळपास १५० मुली कमी असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीला जालन्यात १ हजार मुलांमागे केवळ ८५९ मुली आहेत.

एकीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, अशी घोषणा देत माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी' यासारख्या योजना राबवत आहेत. दुसरीकडे मात्र मुलींचा जन्मदरात घट सुरू असल्याने यामागचे कारण नेमके आहे तरी काय? असा सवाल अनेकजण उपस्थित करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

Tim Southee: टीम साऊदीचा टेस्ट क्रिकेटला रामराम; WTC आधीच न्यूझीलंडची 'कसोटी' लागणार

Gujarat ATS: गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

SCROLL FOR NEXT