Chandrapur News lover's ends their life (file photo)  social media
महाराष्ट्र

Chandrapur News : खळबळजनक! वीज टॉवरला गळफास लावून प्रेमीयुगुलाने मृत्यूला कवटाळलं

Uchali Village: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

रोहित (वय २५) आणि १४ वर्षीय मुलीनं आपले आयुष्य संपवलं. उचली येथे राहणाऱ्या रोहितचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही मुलगी भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहत होती. ती नववीत होती. तिचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करत होते.

काही दिवसांपूर्वी ती वसतिगृहातून आपल्या घरी आली होती. त्या दिवशी तिचे वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते आणि आई घरकामात व्यस्त होती. त्याचवेळी रोहित सकाळी दुचाकीवर तिच्या घरी आला आणि तिला घराबाहेर बोलावले. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून नेले.

आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, उचली शिवारातील एका वीज टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक-युवतीचे मृतदेह आढळून आले. परिसरातील काही नागरिकांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत प्रेमीयुगुलाची ओळख पटवली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून पंचनामा करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT