girl died in leopard attack in dhangarwada near shahuwadi  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : उदागिरी पाठाेपाठ धनगरवाड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार

वनविभागाने बिबट्याचा बंदाेबस्त करावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

काेल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (shahuwadi taluka) शित्तूर वारुण पैकी तळीचा धनगरवाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार झाल्याची घटना समाेर आली आहे. यामुळे शाहूवाडी तालुक्यात आजही बिबट्यांचे हल्ले थांबले नसल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

शाहूवाडी तालुक्यातील कानसा खोर्‍यात देखील बिबट्याची दहशत वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांमुळे लहान बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या परिसरातील वाडी वस्त्यांवरील 50 शेळ्या, दहा जनावरे तसेच 60 ते 70 कुत्र्यांचा फडशा पाडल्याची चर्चा आहे. उदागिरी परिसरात देखील काही दिवसांपूर्वी लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला हाेता. त्यापाठाेपाठ आता धनगरवाडा येथील शाळकरी मुलीला बिबट्याने लक्ष केले. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदाेबस्त करावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: समोरचा खोटं बोलतोय की खरं कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितले 7 अचूक मार्ग

Tea Mistake: चहा बनवताना या 5 चुका करू नका

वहिनीच्या हातचा संपूर्ण कुटुंबाने हलवा खाल्ला, सकाळी तिघांचा मृत्यू, त्या रात्री नेमकं काय घडलं?

IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

Maharashtra Live News Update: धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ, देवपूरमध्ये शेकडो मतदान कार्डांचासाठा

SCROLL FOR NEXT