A woman confronts Minister Girish Mahajan during a BJP protest in Worli, Mumbai, as the incident goes viral and leads to a police complaint. saam tv
महाराष्ट्र

भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर भडकलेल्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Woman Argues With Girish Mahajan During BJP Rally In Mumbai: मुंबईतील वरळी येथे भाजपच्या मोर्चादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्याशी वाद घालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील वरळी येथे ‘नारी वंदन विधेयक’ नामंजूर केल्याच्या निषेधार्थ भाजपने इंडिया आघाडीविरोधात मोर्चा काढला. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. या संतापाच्या विरोधात एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना चांगलंच सुनावलं. याचा व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल झाला. यावर प्रतिक्रिया देखील उमटल्या. आता गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्तेने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

लोकसभेमध्ये नारी शक्ति विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने विरोधात मतदान केल्यानं हे बिल मंजूर होऊ शकलं नाही. याचाच विरोध म्हणून देशभर भाजपने आंदोलन केलं. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या जांभोरी मैदान परिसरात संध्याकाळी भाजपने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचं नेतृत्व गिरीश महाजन यांनी केलं. या मोर्चासाठी परवानगी देखील घेण्यात आली होती. पण आंदोलनामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

त्यात एका महिलेचा मुलगा अडकला. त्यामुळे ती महिला संतप्त झाली. तिने मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावले. तसेच मोर्चावर पाण्याची बाटली मारून फेकली. मात्र हे प्रकरण महाजनांनी अत्यंत शांतपणे हाताळले.

दरम्यान आता या प्रकरणात झेन सदावर्ते उतरली आहे. तिने वरळी पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात तक्रार दिली आहे. ही महिला तिच्या मर्सिडिजमधून उतरून मोर्चात अडथळा आणत होती. ती मोर्चेकरांना असभ्य भाषेत बोलत होती. शट अप, डोन्ट टॉक टू मी, गेट आऊट अशा अपमानजनक शब्दांचा वापर करत होती. आपण वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेविरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशी विनंती आपण केल्याचे झेन सदावर्ते म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खोपोली येथील झेनिथ धबधबा परिसरात 10 ते 12 पर्यटक अडकले

Pune University: पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा? ३ लाखांत मिळतेय पदवी, काय आहे नेमकं प्रकरण?

5 Minute Makeup: फक्त 5 मिनिटांत करा परफेक्ट मेकअप! ऑफिस, कॉलेज आणि पार्टीसाठी सोपा मेकअप रूटीन

Shocking : धक्कादायक! ३३ वर्षीय शिक्षिकेचं २० वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, पतीला समजताच भयंकर घडलं

Chanakya Niti : मुलांना करिअरमध्ये यशस्वी कराचंय? चाणक्यांच्या या ४ गोष्टी पालकांनी नक्कीच वाचा

SCROLL FOR NEXT