general motors workers morcha at minister suresh khade bungalow in sangli saam tv
महाराष्ट्र

Bhaubeej 2023: साहेब, लहान बहिण म्हणून समजून घ्या... जनरल मोटर्सच्या कामगारांच्या पत्नींची आर्त हाक

विजय पाटील

Sangli News :

भाऊबीज निमित्त तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांच्या पत्नींनी आज (गुरुवार) कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचा प्रश्न तातडीने निकाली काढा, हीच आमची भाऊबीज भेट ठरले अशी मागणी करणार असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. यावेळी मंत्री खाडे यांच्या सांगली येथील बंगल्यावर पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त हाेता. (Maharashtra News)

पुण्यातील जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगाव पुणे मधील प्रकल्प एका नामांकित कंपनीला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या १००० कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही.

नवीन येणाऱ्या कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात अशी कामगाराची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून कामगारांच्या प्रश्नाचे गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने कामगारांनी कामगार मंत्र्याच्या घरासमोर आजं धडक मारली. यावेळी कामगारांसमवेत त्यांच्या पत्नी देखील हाेत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्हांला कुटुंब अथवा प्रपंच चालविताना फार माेठी आर्थिक अडचण भासत आहे. तरी आमची मागणी करुन भाऊबीजेचे मंत्री महाेद्यांनी गिफ्ट द्यावे अशी भावना कामगरांच्या पत्नींनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT