Gautami Patil New Video saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil New Video: बुरुम बुरुम... गौतमी पाटीलसोबत चिमुकल्यांचा भन्नाट डान्स, नुसता कल्ला! पाहा व्हिडिओ

Gautami Patil's new video: सबसे कातिल गौतमी पाटीलचा नवा व्हिडिओ व्हायरल, चिमुकल्यासोबत धरला ठेका

रोहिदास गाडगे

Gautami Patil Dance Video: खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहोता. यावेळी गावकऱ्यांनी गौतमीच्या आदाकारीला चांगलाच प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.

गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की गर्दी आणि राडा असे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र खेडमधील गौतमीचा कार्यक्रम कोणत्याही मोठ्या घटनेशिवाय पार पडला. यावेळी तरुणाईसह महिला, तरुणी, चिमुकल्यांनीही गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद दिला.

परंतु गौतमीच्या कार्यक्रमात काही अगळं वेगळं घडलं की त्यावरून वाद होतोच. खेडमधील हा कार्यक्रम देखील चर्चेत आला आहे. खेड तालुक्यातील मोहितेवाडी येते गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गौतमीने एका चिमुकल्याला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलवलं आणि त्याची गालावर किस केलं. आता गौतमीचं चिमुकल्यांसोबतचं हे वर्तन चर्चेत आलं आहे. (Latest Marathi News)

झालं असं की गौतमी पाटीलला समोर डान्स करताना पाहून उपस्थित प्रेक्षकांमधील तरुणाई आणि लहान मुलं देखील जाग्यावर उभे राहून डान्स करू लागले. हे पाहून गौतमीने या चिमुकल्यांना थेट स्टेजवर बोलवले आणि त्यांच्यासोबत डान्स केला. दरम्यान गौतमीने एका लहान मुलाला तिच्या गालावर किस करायला सांगितले. मात्र त्या चिमुकल्याने तिला भाव दिला नाही. त्यानंतर गौतमीनेच त्याच्या गालावर किस केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'बाबा, हा शेवटचा कॉल, यापुढे...; भरस्त्यात मुलीनं चापट मारणं जिव्हारी लागलं, तरुणानं लिंबाच्या झाडाजवळ जीवन संपवलं!

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार आला समोर; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

पाकिस्तान भूगोलात राहायचं की इतिहासात? लष्करप्रमुखांचा शेजारील देशाला इशारा

भीषण अपघाताचा थरार! भरधाव कार कंटेनरला धडकली, ५ जणांचा जागीच मृत्यू

'काही बेरोजगार युवक म्हणजे कॉक्रोच', सरन्यायाधीशांच्या विधानानं नवा वाद

SCROLL FOR NEXT