'काही बेरोजगार युवक म्हणजे कॉक्रोच', सरन्यायाधीशांच्या विधानानं नवा वाद

Cji Suryakant Cockroach Remark Unemployment Row: सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी "काही बेरोजगार युवक म्हणजे झुरळ आहेत असं विधान केलं.मात्र यामुळे विरोधकांना मोदी सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली...सरन्यायाधीश असं का म्हणाले? नेमकं काय घ़डलं? पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
CJI Suryakant’s controversial remark on unemployed youth ignites debate across political and legal circles.
CJI Suryakant’s controversial remark on unemployed youth ignites debate across political and legal circles.saam tv
Published On

देशभरात सध्या एका विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय. मात्र, हे विधान कुठल्या राजकीय नेत्यानं नव्हे तर देशाच्या सरन्यायाधीशांनी केलंय..आणि या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी एक टिप्पणी केलीये. काय आहे ही टिप्पणी पाहूयात...

देशात काही तरुण आहेत जे झुरळासारखे आहेत.. ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नाही.त्यातले काही माध्यमात जातात, काही समाजमाध्यमात काही आरटीआय कार्यकर्ते बनतात, तर काही इतर कार्यकर्ते... आणि मग ते सगळ्यांवरच हल्ले करत सुटतात..

सरन्यायाधीशांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसनं हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत केंद्र सरकारला जबाबदार धरलंय.

तर संजय राऊतांनी मुख्य न्यायाधीशांच्या घरासमोर आता आंदोलन करा असं म्हणत टोला हाणलाय..

खरंतर, एप्रिल 2026 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 5.2 टक्क्यांवर नोंदवला गेलाय. इतकंच नव्हे तर सफाई कर्मचारी भरतीसाठी उच्चशिक्षित उमेदवार अर्ज भरताहेत. सफाई कामगारांच्या भरतीत जागांसाठी उच्चशिक्षित तरुणांच्या अर्जामुळे याआधीच देशातील बेरोजगारीचं वास्तव समोर आलंय. वरिष्ठ वकीलाचा दर्जा देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत अशी मागमी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सुर्यकांता यांनी ही टिप्पणी केली होती.मात्र नंतर सरन्यायाधीशांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं..

सरन्यायाधीश सूर्यकांता यांनी आपल्या शब्दांचा विपर्यास केल्याचं जरी म्हटलं असलं तरी बेरोजगार तरुणांची 'झुरळा'शी करण्यात आलेली तुलना ही सद्य समाजव्यवस्थेचं अपय़श आहे का, याचा नव्यानं विचार करायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com