Devendra Fadnavis Affidavit Case: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोर्टात हजर राहावं लागणार? नेमकं काय आहे प्रकरण?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांना यांना १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहावे लागू शकते.
Devendra Fadnavis Affidavit Case
Devendra Fadnavis Affidavit CaseSAAM TV
Published On

Devendra Fadnavis offense in affidavit News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविली असा आरोप अॅड. सतीश उके यांच्यातर्फे करण्यात आला होता. या पप्रकराणात उके यांच्यातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपी असलेले देवेंद्र फडणवीस यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालपपुढे उपस्थित राहावे लागू शकते.

Devendra Fadnavis Affidavit Case
GT vs CSK IPL Match Highlights: गुजरात टायटन्सने जिंकून दाखवलं; स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा पराभव

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकासाठी दाखल केलेल्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे.

या तक्रारीवरील सुनावणीदरम्यान शुक्रवारी उके यांच्या बाजूने उक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर आता कायदेशीर प्रक्रियेनुसार विरोधात तक्रार असणाऱ्या व्यक्तीला न्यायालयात जबाबासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis Affidavit Case
Horoscope In Marathi : आजचा दिवस सुजलाम सुफलाम! या राशीला अचानक धनलाभ होणाार

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना यांना १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहावे लागू शकते. परंतु ते कामात व्यस्त असल्यास त्यांचे वकील बाजू मांडू शकतात. या प्रकरणात अॅड. उदय डबले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडली आहे.

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com