Aadhaar card check made mandatory for Garba entry sparks religious and political controversy ahead of Navratri saam tv
महाराष्ट्र

Garba: 'गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री'; आधार कार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश?

Muslim Entry Ban in Garba Events: आता मुस्लिमांना गरब्यात एण्ट्री देऊ नये, अशी भूमिका हिंदूत्ववादी संघटनांनी घेतलीय.मात्र गरब्यात एण्ट्री न देण्यामागे नेमकं काय कारण आहे? आणि त्यावरुन कसं राजकारण तापलंय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • गरब्यात मुस्लीमांना प्रवेश न देण्यावरून नवा वाद.

  • आधार कार्ड तपासूनच गरबामध्ये प्रवेश देण्यात यावा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केलंय.

  • या निर्णयामुळे धार्मिक व राजकीय वातावरण तापलं आहे.

नवरात्रोत्सव 2 दिवसांवर आलाय, मात्र त्याआधीच दांडीयात मुस्लीमांना प्रवेश देण्यावरुन नवा वाद पेटलाय. गरब्यात मुस्लीमांना प्रवेश देऊ नये. तसंच आधार कार्ड तपासूनच एण्ट्री द्यावी, अशी मोहीमच विश्व हिंदू परिषदेनं सुरु केलीय. एवढंच नाही तर मुस्लीम तरुण गरब्यात अनधिकृतरित्या प्रवेश करुन हिंदू मुलींना जाळ्यात अडकवत असल्याचा आरोपही करण्यात आलाय.

त्यामुळे गरब्यात मुस्लीम तरुण दिसल्यास त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्याचं आवाहन हिंदूत्ववादी संघटनांनी केलंय.. याच हिंदूत्ववादी संघटनांच्या भूमिकेवर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय.. एवढंच नव्हे तर धर्माधर्मात भांडण लावून राजकीय पोळी भाजण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय

खरंतर हिंदू सणांमध्ये मुस्लिमांना प्रवेश बंदीची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचं, मुस्लिमांकडून खरेदी न करण्याचं आवाहन भाजप नेत्यांनी केलं होतं. मात्र कोर्टाने चपराक दिल्यानंतर हिंदूत्ववादी संघटना आता गरब्यात प्रवेश देण्याबाबत धार्मिक कार्ड पुढे करत असतील तर हा देशाच्या गंगा जमना तहजीबलाच छेद देण्याचा प्रकार आहे. देशाच्या सहिष्णुतेवरतीच प्रहार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT