Ganpatipule Temple x
महाराष्ट्र

Ganpatipule : गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू! तोकड्या कपड्यांवर बंदी, दर्शन घेण्यासाठी पाळावा लागेल नियम

Ganpatipule Temple : रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर केली आहे. भाविकांना मंदिरात दर्शनासाठी ड्रेसकोड पाळावा लागणार आहे.

Yash Shirke

अमोल कलये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ganpatipule Temple Dresscode : गणपतीपुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. भाविकांसाठी वेशभूषेची नियमावली जाहीर झाली आहे. गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून नियमावली संबंधित बोर्ड लावण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून ड्रेसकोडचा बोर्ड लावण्यात आला आहे. यात कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाणेसाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरात गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करु नये असेही बोर्डवर नमूद केलेले आहे.

असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे घालून मंदिरात येऊ नये असेही आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्यांना मंडळींना मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल आणि त्याकरिता आम्हाला भीड घालू नये, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. १० वर्षांखालील मुलांना या नियमातून सूट आहे, असे बोर्डवर लिहिलेले आहे.

रत्नागिरीतील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी देशभरातून हजारो गणेशभक्त गणपतीपुळे या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. गणपतीपुळ्याला समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला अनेकजण देवदर्शनाच्या व्यतिरिक्त सहलीच्या निमित्ताने देखील भेट देत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT