Pankaja Munde : वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम, विरोधी उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आले नाही!

Beed Pankaja Munde : वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली बँकेचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundesaam tv
Published On
Summary
  • वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत पंकजा व धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा एकहाती विजय.

  • विरोधी उमेदवारांचे डिपॉझिटही वाचले नाही; १३ पैकी सर्व जागा मुंडे पॅनलच्या ताब्यात.

  • शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा मोठा पराभव; फक्त १,४०७ मते मिळाली.

  • निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळ गोपीनाथ गडावर श्रद्धांजलीसाठी रवाना.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १३ जागांसाठी मतदान झाले होते. एकूण १७ जागांपैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १३ जागांसाठी मतदान करण्यात आले होते. यातील विरोधी उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्याइतकेही मतदान मिळालेले नसल्याचे म्हटले जात आहे. वैद्यनाथ बँकेत पंकजा मुंडेंचा एकहाती विजय झाला आहे.

वैद्यनाथ बँकेच्या बीडसह राज्यभरात अनेक शाखा आहेत. या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (१२ ऑगस्ट) बीडच्या बाजार समितीत पार पडली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या मुंडे बहीणभावाच्या नेतृत्त्वाखाली सर्व उमेदवार वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pankaja Munde
Maharashtra Politics : अजित पवार गटाला हादरा! बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

विजयी कौल घेऊन नूतन वैद्यनाथ बँक संचालक मंडळ गोपीनाथ गडाकडे रवाना झाले आहे. गोपीनाथ गडावर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी संचालक मंडळ नतमस्तक होणार आहे. वैद्यनाथ बँक निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते.

Pankaja Munde
Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला. मुंडे यांचा उमेदवार असलेल्या रमेश कराड यांना १४३१६ मते मिळाली. तर शरद पवार गटाच्या राजाभाऊ फड यांना १४०७ मते मिळाली. या निवडणुकीच्या रिंगणात शरद पवार गटाचे तीन उमेदवार होते. पण पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले.

Pankaja Munde
Crime : २१ वर्षीय तरुणीचा रात्री संशयास्पद मृत्यू, पहाटेच अंत्यसंस्कार, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com