Nilesh Ghaywal  Saam tv
महाराष्ट्र

Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळने लंडनला जाण्यासाठी पासपोर्ट कसं मिळवलं? पोलिस यंत्रणेलाही पत्ता लागेना

Nilesh Ghaywal News : गुंड निलेश घायवळने शासनाची फसवणूक करून पासपोर्ट मिळवल्याचं उघड झालं आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Akshay Badve

घायवळने २०१९ साली बनावट पत्ता वापरून मिळवला पासपोर्ट

पुण्यात गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही मिळवला पासपोर्ट

पोलिसांनी पासपोर्टसाठी दिला होता 'Not Available' असा अहवाल दिला

पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी आणि तपास सुरू

पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळने पासपोर्ट काढण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याचे तपासातून समोर आलं आहे. शासनाच्या अनेक यंत्रणांची फसवणूक करून निलेश घायवळने पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यात अनेक गुन्हे असल्यामुळे पासपोर्ट मिळाला नसता त्यामुळे थेट अहिल्यानगरमधील एका चुकीचा पत्ता दाखवत कागदपत्र देत पासपोर्ट मिळवला.

अहिल्यानगर पोलिसांनी त्याचा येथील पत्त्यावर घायवळ 'Not Available' असा शेरा दिल्यावर सुद्धा त्याला पासपोर्ट मिळालाच कसा असा प्रश्न आता निर्माण झालाय. पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात लुक आऊट नोटीस जारी केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं की, 'निलेश घायवळने २०१९ साली पासपोर्ट मिळवला. त्यावेळी दिलेला पत्ता बनावट दिल्याचे निष्पन्न झालं आहे. घायवळने अहिल्यानरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घराचा पत्ता दिला होता. त्याठिकाणी त्याचं कोणतंही अस्तित्व नाही. त्या ठिकाणी कधीही राहत नव्हता. शासन आणि पासपोर्ट विभागाची फसवणूक करून पासपोर्ट मिळवला आहे'.

'त्याने अनेक बाबी लपवून पासपोर्ट मिळवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. पासपोर्ट मिळवताना त्याने काय केलं, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, लंडनला पळालेल्या निलेश घायवळला कधी अटक करणार, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teeth Whitening: दात पिवळे पडलेत? तर त्वरीत पांढरे करण्यासाठी करा 'हे' प्रभावी घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: एअर इंडियाच्या विमानामध्ये बिघाड, दिल्लीला जाणारं विमान पुण्यातच थांबलं

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी रात्री झोपताना लावा कोरफड आणि गुलाबपाणी, पाच दिवसात दिसेल फरक

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरात वादग्रस्त स्टेटस अन् मोठा जमाव जमला; नेमकं काय घडलं? VIDEO

Fact Check : केंद्र सरकारची बेरोजगारी भत्ता योजना! तरुणांना दरमहा २,५०० रुपये मिळणार, काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT