छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये पती-पत्नींचाही समावेश असल्याची माहिती आहे.
या दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची खरीपाची पीके वाळून गेली आहेत. एकीकडे दुष्काळसृदश्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी आता सरकारच्या निधीकडे, घोषणेकडे आस लावलीय. दुसरीकडे एक धक्कादायक घटना घडलीय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मनोहर भिवसन दुधे आणि पर्वताबाई मनोहर दुधे अशी मृतांची नावे आहेत. मूगाच्या शेंगा तोडण्यासाठी शेतात गेलेले दुधे कुटुंब पावसापासून बचावासाठी झोपडीत थांबले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. तर दुसरी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील वाघुळखेडा येथे घडली. हाती आलेल्या माहितीनुसार, शेतात अद्रक पिकाची खुरपणी चालू होती. त्यावेळी पाऊस सुरू झाला. काहीजणांनी कवठाच्या झाडाचा आसरा घेतला. याचवेळी झाडावर वीज कोसळून फर्जाना हामीद सय्यद, आल्मीरा हामीद सय्यद आणि तस्लीम मुक्तार सय्यद यांचा मृत्यू झाला. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जालन्यासह मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यातच संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे वादळी पावसादरम्यान शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पती-पत्नीवर काळाचा घाला आला. झोपडीवर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. मात्र, या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीय.
दरम्यान, कन्नड तालुक्यातील पिशोर येथेही वीज पडण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून २ महिला आणि १ पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जालना शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक दिवसांच्या खंडानंतर जालन्यात दमदार पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.