Ganeshostav Ticket  x
महाराष्ट्र

Train Ticket Booking Tips : चाकरमान्यांनो… गणपतीला गावाला जाताय? तिकीट बुक करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

Ganeshostav Ticket : गणेशोत्सवासाठी अनेकांना गावाला जायची ओढ लागलेली असते. अशात तिकीट बुक करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. तेव्हा तिकीट बुक करण्याआधी खाली नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Yash Shirke

२७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी आहे. आतापासूनच भाविकांना गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. जून-जुलै सुरु झाल्यापासूनच चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाला जायच्या तयारीला लागतात. यात सर्वात महत्त्वाचे आणि कठीण काम म्हणेज तिकीट बुक करणे. तिकीट बुकिंगसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने धाव घेत असतात. यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर गर्दी दिसून येते. तिकीट बुक करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. आधीच नियोजन करावे.

रेल्वे नियमांनुसार प्रवासाच्या १२० दिवस म्हणजेच ४ महिने आधीत तिकीट बुक करता येते. तेव्हा गणेशोत्सवासारख्या प्रसंगी आधीच नियोजन करुन तिकीट बुक करणे फायदेशीर ठरते.

२. एकावेळी फक्त ६ तिकीट बुक करणे.

आयआरसीटीसीच्या नियमांनुसार, एका यूजरला एकावेळी फक्त ६ तिकीट बुक करता येतात. त्यामुळे जास्त प्रवासी प्रवास करणार असतील, तर दोघांतिघांनी तिकीट बुक करावे.

३. कन्फर्म तिकीट ओळखा.

जर तुमच्याकडील तिकीट कन्फर्म असेल, तर त्यावर सीट आणि कोच नंबर नमूद केलेला असतो. यामुळे प्रवासादरम्यान गैरसोयी टाळता येतात.

४. तिकीट रद्द करताना वेळेची मर्यादा ओळखणे.

जर तुम्हाला तिकीट रद्द करायचे असेल, तर ट्रेन सुटण्याच्या किमान चार तास आधी तिकीट रद्द करता येते. यानंतर रिफंडसाठी थेड ई-मेलद्वारे विनंती करावी लागते.

५. रिफंड मिळवणे.

जर चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट रद्द करायचे असेल, तर etickets@irctc.co.in या ई-मेलवर तिकीटासंबंधित माहिती पाठवावी. तपासणी झाल्यानंतर पैसे रिफंड केले जातील. चार्ट तयार झाल्यानंतरही आयआरसीटीच्या वेबसाइटवरुन टीडीआर भरुन रिफंडसाठी अर्ज करता येतो.

६. वेटिंग तिकीटावर प्रवास करणे.

जर तुमचे तिकीट वेटिंगमध्ये असेल आणि चार्ट तयार होईपर्यंत तिकीट कन्फर्म झाले नाही, तर त्या तिकीटावरुन प्रवास करता येत नाही. पण या तिकीटाचा रिफंड आपोआप मिळतो.

महत्त्वाचे -

वेटिंग आणि आरएसी असलेल्या तिकीटांसंबंधित निर्णय ट्रेन निघण्याच्या चार तास आधी तयार होणाऱ्या चार्टमध्ये ठरत असतो. त्या चार्टमध्ये तिकीट कन्फर्म झाले की नाही, हे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई ३ दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

ITR Filling: आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवली; शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

Mahadev Munde Case : गळा कापला, अंगावर १६ वार; महादेव मुंडेंचा अंगावर काटा आणणारा पोस्टमार्टम रिपोर्ट

Akola Rain : अकोल्यात ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा, शेतशिवारात 7 फूट पाणी | VIDEO

Snakebite : ती काळरात्र ठरली! गाढ झोपेत साप चावला, १९ वर्षाच्या तरूणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT