Pune News : माझे धनी जिंकले हो! सरपंच पतीला कारभारणीनं खांद्यावर उचललं अन् गावभर मिरवलं; VIDEO व्हायरल

Pune Khed Gram Panchayat Election : व्हिडिओत तुम्ही बघत असाल तर राधिका शिंदे यांनी आपले नवनियुक्त सरपंच कैलासराव शिंदे यांना खांद्यावर उचलून जल्लोष साजरा करत आहेत. वाजंत्रीच्या तालावर राधिका शिंदे नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
Pune Khed Gram Panchayat Election
Pune Khed Gram Panchayat ElectionSaam Tv News
Published On

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुणे : माझा कारभारी लै भारी! खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या विजयाचा हटके जल्लोष पाहायला मिळाला असून पत्नीनं नव्या सरपंच पतीला खांद्यावर उचलून विजयाचाही जल्लोष केला. पतीला खांद्यावर उचलून पत्नीनं गावभर मिरवलं, याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीत आज एक अनोखा आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. सरपंचपदी कैलासराव शिंदे यांची बिनविरोध निवड होताच, त्यांच्या पत्नी राधिका शिंदे यांनी विजयाचा जल्लोष हटके पद्धतीने साजरा करत सरपंच पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं. पत्नीनं गावासमोर त्यांच्या यशाचा डंका वाजवला. या आनंदात केवळ एक पत्नीचा अभिमान नव्हता, तर होता तिचा पतीबद्दलचा विश्वास, त्याच्या नेतृत्वाच्या ताकदीवरचा ठाम भरोसा आणि एक स्त्री म्हणून गावासाठी लढण्याचा अट्टहास यातून जाणवत होता. 'माझा नवरा फक्त माझा जोडीदार नाही, तर आता गावाचा आधार आहे', असं जणू तिच्या कृतीतून दिसून आलं. हा क्षण केवळ एका बिनविरोध निवडीचा नव्हता, तर एक जोडपं जबाबदारीच्या वाटचालीस एकत्र निघाल्याचा देखील होता.

Pune Khed Gram Panchayat Election
Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तर ५ मिनिटांत..., हिंदी भाषा सक्तीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडिओत तुम्ही बघत असाल तर राधिका शिंदे यांनी आपले नवनियुक्त सरपंच कैलासराव शिंदे यांना खांद्यावर उचलून जल्लोष साजरा करत आहेत. वाजंत्रीच्या तालावर राधिका शिंदे नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पतीच्या डोक्यावर फेटा बांधून रुबाबत आपला मान मिरवताना दिसत आहे.

दरम्यान, २०२१ साली खेड तालुक्यातल्याच एका विजयी उमेदवाराचा फोटो सोशल माध्यमात असाचा गाजला होता. आपला पती ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर एका पत्नीने आपल्या पतीला खांद्यावर बसवून हा जल्लोष साजरा करत हा आनंद साजरा केला होता. खेड तालुक्यातील आदिवासी भागातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव करत भाजपाच्या जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागांवर आपलं वर्चस् त्यावेळी मिळवलं होतं.

Pune Khed Gram Panchayat Election
Raj Thackeray: हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; ६ जुलैसाठी केली मोठी घोषणा, मराठी बांधवांना आवाहन करत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com