sangli, ganeshotsav 2023 saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 : चर्चा तर हाेणारच!कार्यकर्त्याचे लग्न हाेताच गणेशाेत्सव मंडळ देणार 10 हजार रुपये

जास्त अपेक्षा न करता होतकरू तरूणांना मुली देऊन समाजाने दृष्टी बदलली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

विजय पाटील

Sangli Ganpati Utsav : मिरज शहरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची लग्न जुळत नसल्याने डोक्याला बाशिंग बांधून घोड्या वरून वरात काढून देखाव्याच्या रुपात व्यथा मांडली आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मंडळाच्या परिसरात माेठी गर्दी हाेत आहे. (Maharashtra News)

शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कडून विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक असे सजीव आणि निर्जीव देखावे सादर केले जात आहेत. महात्मा गणेशाेत्सव मंडळ नदिवेस माळी गल्ली यांनी अनोखा देखावा सादर केला आहे.

या मंडळाने त्यांच्यातील होतकरू सदस्यांची लग्ना जुळत नसल्याची व्यथा समजसमोर मांडली आहे. शेतकरी, छोटे मोठे व्यवसाय करणारे मंडळाचे सुमारे 25 सदस्य गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण नवरदेवाला सरकारी नोकरी पाहिजे असा मुलींच्या बापाचा अट्टाहास असून मुलींच्या अपेक्षा वाढल्याने लग्न जुळत नाहीत.

ही व्यथा मांडण्यासाठी मंडळाचे सदस्य प्रशांत मोतूगडे यांच्या संकल्पनेतून नवरदेवाची घोड्यावरून वरातीचा देखावा सादर करण्यात आला. कोणी मुलगी देता का मुलगी अशा आशयाचे फलक, मुलींच्या अपेक्षा, वाजंत्री ,वरात यांचा देखाव्यात समेवश होता.

यावर्षी ज्या सदस्याचे लग्न प्रथम होइल त्याला 10 हजार रुपये मंडळाकडून भेट देण्याचे प्रशांत मोतूगडे यांनी जाहीर केले आहे. शेतकरी , छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या तरूणांना मुली दिल्या जात नाहीत. जास्त अपेक्षा न करता होतकरू तरूणांना मुली देऊन समाजाने दृष्ठी बदलली पाहिजे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई मोरे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

SCROLL FOR NEXT