Sambhajinagar Adarsh Scam : २ कोटी ७ लाखांची वसुलीसाठी 'आदर्श' च्या कर्जदारांच्या १९ मालमत्तांचा लिलाव हाेणार, जिल्हाधिका-यांचे कर्जदारांना आवाहन

adarsh nagari sahakari patsanstha aurangabad : पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत.
Sambhajinagar Adarsh Scam
Sambhajinagar Adarsh ScamSaam tv
Published On

Sambhajinagar Adarsh Scam : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकबाकीदारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी संस्थेतर्फे कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांची सहकार कायद्यानुसार जप्ती करण्यात येणार आहे. त्या मालमत्ताचा ताबा मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. (Maharashtra News)

Sambhajinagar Adarsh Scam
Kokan Politics : इतकी घाई करू नका, इच्छा असेल तर बंधूंना भाजपात पाठवा; नितेश राणेंचा उदय सामंतांना सल्ला

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय (astik kumar pandey ias) यांनी १९ कर्जदारांच्या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यातून पतसंस्थेची २ कोटी ७ लाख रुपये रक्कम लिलावाद्वारे वसूल केली जाणार आहे.

Sambhajinagar Adarsh Scam
Bhandara Ganesh Visrajan : बाप्पाच्या विसर्जनासाठी भंडा-यात 12 ठिकाणी कृत्रिम कुंड, 50 पालिका कर्मचारी तैनात

आदर्श पतसंस्थेच्या सर्व कर्जदारांनी कर्जाची रक्कम तत्काळ भरावी. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, प्रशासक समिती यांनी केले आहे.

आदर्श पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह अन्य संचालक सध्या अटकेत आहेत. आदर्श पतसंस्थेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सहकार खात्याने प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने थकीत कर्जाच्या वसुलीला सुरुवात केली आहे.

थकबाकीदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांची जप्ती करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासक समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी यांनी १९ कर्जदारांच्या मालमत्तांचा ताब्यासाठी परवानगी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sambhajinagar Adarsh Scam
Success Story : दुग्ध व्यवसायातून प्रगती, महिन्याला साडेपाच लाखांचे उत्पन्न; वाचा साळुंबरेतील शेतकऱ्याची यशाेगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com