शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अमोल किर्तीतर यांच्या चौकशीवरून तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला संपूर्ण देशातून मोठा पाठिंबा मिळत असताना ईडीसारखे प्रयोग थांबवण्याची गरज आहे. ईडीच्या चौकशांमुळे लोकांमध्ये चिड निर्माण झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
शिवसेना भाजपाची युती असताना खासदार झालो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे युतीधर्म मी पाळलेला आहे. १० वर्ष खासदार असताना फार महत्वाचे बदल दिल्लीत पाहायला मिळाले. ३७० कलम, जीएसटी, तिहेरी तलाक, राम मंदिर, अशा अनेक प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केलं. या सर्व गोष्टीमुळे आमची इच्छा आहे की, नरेंद्र मोदी यांनी पाच नाही तर १० वर्ष पंतप्रधान पदावर राहावंं. देशातील जनता पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी राहील, यात शंका नाही, मात्र ४०० पारचा नारा दिला, त्यामध्ये कुठेतरी दर्प येता कामा नये, असं गजानन किर्तीकर म्हणाले.
कर नाही त्याला डर कशाला?- अमित साटम
गजानन कीर्तिकर यांचं देशप्रेमापेक्षा पुत्र प्रेम वरचढ झालेलं दिसतं आहे. पुत्र प्रेमामुळे त्यांचं असं वक्तव्य दिसत आहे. अमोल किर्तीकर निर्दोष असतील तर भीती कसली. यंत्रणांना आपलं काम निपक्षपणे करालया द्यालं. कर नाही त्याला डर कशाला?अमोल कीर्तीकर यांनी जर काही केले नसेल त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला अमित साटम यांनी लगावला आहे.
गजानन किर्तीकर यांनी गुरुवारी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर याच्या ईडी चौकशीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून आज उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अमोल किर्तीकर निवडून येणार म्हणून त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावली आहे, मात्र पीएम फंड आणि शिंदे गटाकडे ईडीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.